नवी दिल्ली, 7 एप्रिल: सध्याच्या काळात पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं खूप गरजेचं झालंय. अशा वेळी लोक एफडीला जास्त सुरक्षित पर्याय मानतात. एफडीवर जास्त रिटर्न कोणती बँक देते याकडे सर्वांचं लक्ष असतं. दरम्यान आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक कॅनरा बँकेने फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ केली आहे. कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर नवीन व्याजदर 5 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत.
FD व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, कॅनरा बँक त्यांच्या रेग्यूलर कस्टमर्सला 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मॅच्योरिटीच्या कॉलेबल डिपॉझिटवर 7.25 टक्के व्याज ऑफर करतेय. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 4 टक्के ते 7.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
दुरुस्तीनंतर व्याजदर काय आहेत?
तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर कॅनरा बँक हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. दुरुस्तीनंतर, 444 दिवसांच्या कालावधीसह बँकेच्या एफडीसाठी कमाल व्याज दर आता 7.90 टक्के आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कॅनरा बँकेत एफडीमध्ये गुंतवणूक करून मोठा फायदा घेऊ शकता.
फक्त 1 वर्षांसाठी FD करायचीये? या बँका देताय जबरदस्त रिटर्नकॉलेबल डिपॉझिटवर हे आहेत नवीन दर
5 एप्रिल, 2023 पासून लागू 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या कॉलेबल डिपॉझिटसाठी टर्म डिपॉझिट व्याजदर सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 दिवसांपासून ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींसाठी 4 टक्क्यांवरून सुरू होतील. दुसरीकडे, 5 वर्षे आणि 10 वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींसाठी, नियमित ग्राहकांना 6.70 टक्के दराने व्याज मिळू शकते, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ते 7.20 टक्के आहे.
Axis बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी गुडन्यूज! आता मिळतेय ‘ही’ खास सुविधानॉन-कॉलेबल डिपॉझिटसाठी 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी काळात मॅच्योअर होणाऱ्या एफडीवर सामान्य नागरिकांना 7.10 टक्के ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर मिळेल. तर 46 दिवसांसाठी 99 दिवसांच्या काळावधीसाठीच्या एफडीवर 5.30 टक्क्यांपासून सुरु होईल. यासोबतच कॅनरा बँक 15 लाख रुपयांपासून अधिकच्या नॉन-कॉलेबल डिपॉझिटसाठी 444 दिवसात मॅच्योअर होणाऱ्या एफडीवर सामान्य नागरिकांसाठी 7.40 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के व्याज व्याज ऑफर करतेय.