नवी दिल्ली, 18 एप्रिल: प्रॉपर्टीविषयी लोकांना अनेकदा अनेक प्रश्न पडतात. विशेषतः ज्यावेळी प्रॉपर्टी वडील किंवा सासरची असते. कोणत्याही प्रॉपर्टीवर कोण मालमत्तेवर दावा करू शकतो? कोणा कोणाला याचा हक्क मिळतो? याचे नेमके नियम काय आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तसं पाहिलं तर नियम-कायदे हे देखील अपडेट होत असतात. संहिताही नव्या युगाच्या गरजेनुसार बदलल्या जातात आणि कायदेही. मालमत्तेशी संबंधित कायद्यांबाबत लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. अनेकदा गोंधळ आणि त्यासंबंधीची माहिती नसल्यामुळे मालमत्तेशी संबंधित वादही होतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सुनेचे कोणते अधिकार आहेत, विशेषत: सासरच्या घरात आणि संपत्तीवर तिचा किती अधिकार आहे. कायदा काय म्हणतो याविषयी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत.
सुरक्षा कायद्याने महिलांना पतीसोबत घरात राहण्याचा अधिकार दिलाय हे सर्वांना माहितीच आहे. हा अधिकार स्त्रीच्या पोटगी आणि मानसिक आणि शारीरिक हिंसाचारापासून संरक्षणाच्या अधिकाराव्यतिरिक्त आहे. मात्र पतीच्या संपत्ती पत्नीच्या अधिकारांसंबंधीत मुद्दाही संपत्तीच्या विभागणीशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा आहे. पती आणि सासरच्या संपत्तीमध्ये पत्नीचा काही हक्क आहे की नाही आणि यासंबंधित नियम काय आहे?
सोसायटीत फ्लॅट खरेदी करताय? स्विमिंग पूल आणि क्लब नाही, तर ‘या’ गोष्टींकडे द्या लक्षकायद्यात काय तरतूद आहे
ज्या व्यक्तीशी महिलेचं लग्न झालंय. त्याच्याकडे स्वत:ची कोणतीही मालमत्ता असेल, तर याबाबतचे नियम व कायदे स्पष्ट आहेत. व्यक्ती स्वतःची मालमत्ता मग ती जमिन असो घर असो दागिने असो किंवा काहीही असतो. त्यावर फक्त त्या व्यक्तीचा अधिकार असतो. म्हणजेच ज्याने संपत्ती कमावली आहे. तो त्या संपत्तीला विकू शकतो, गहाण ठेवू शकतो किंवा दानही करु शकतो. यासंबंधित सर्व अधिकार त्याच्याजवळ सुरक्षित असतात.
ATM मधून कॅश काढल्यानंतर कॅन्सल बटण दाबणं गरजेचं? जाणून घ्या उत्तरसुनेचा सासु-सासऱ्यांच्या संपत्तीवर अधिकार
सासु-सासऱ्यांच्या संपत्तीवरही सामान्य परिस्थितीत महिलांचा कोणताही अधिकार नसतो. मग ते जिवंत असो किंवा नसो. महिला त्यांच्या संपत्तीव कोणताही दावा करु शकत नाही. सासु-सासऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्ती अधिकार महिलेला नाही तर तिच्या पतीला मिळतो. मात्र सासु-सासऱ्यांच्या पहिलेच पतीचा मृत्यू झाला. तर अशा परिस्थितीत महिलेला संपत्तीमध्ये अधिकार मिळतो. मात्र यामध्ये सासु-सासऱ्यांनी त्यांची संपत्ती इतर कोणाच्या नावावर केलेली नसावी. एवढंच नाही तर आई-वडिलांच्या परवानगीशिवाय मुलगा देखील त्यांच्या घरात राहू शकत नाही. ज्यावेळी वडिलांनी स्वतःच्या पैशांनी संपत्ती खरेदी केलेली असेल. तेव्हा मुलगा कायद्याचा वापर करुनही त्यांच्या घरात राहू शकत नाही.