मुंबई, 16 मे : घर घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. नोकरी करणारी व्यक्ती सहसा करिअरच्या सुरुवातीला घर घेण्याचा विचार करत नाही. स्वतःचे घर खरेदी करणे हे त्याच्या प्राथमिकतेत अजिबात नसते. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास करिअरच्या अगदी सुरुवातीला घर खरेदी करणे खूप फायदेशीर ठरते. घराच्या रूपात, तुमच्याकडे खरोखरच अशी मालमत्ता आहे, ज्याच्या आधारावर तुम्ही कोणतेही मोठे पाऊल उचलू शकता.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुमच्या करिअरच्या सुरुवातीला घर खरेदी करणे ही एक शहाणपणाची चाल आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अविवाहित असते आणि तिला मुले नसतात तेव्हा जबाबदाऱ्या मर्यादित असतात. त्यामुळे मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा हा सर्वोत्तम काळ म्हणता येईल. त्यामुळे घर खरेदीसाठी उशीर करणे योग्य नाही.
दीर्घ कालावधी आणि कमी EMI
Mint.com च्या रिपोर्टनुसार, जेव्हा तुम्ही लहान वयात घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेतो तेव्हा तुमच्याकडे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी जास्त वेळ असतो. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 20 ते 25 व्या वर्षी गृहकर्ज घेतले तर त्याला ते आरामात फेडण्यासाठी 20 वर्षे मिळतात. अशा प्रकारे, त्याला जास्त ईएमआयचा भार सहन करावा लागत नाही आणि तो एक मालमत्ता तयार करतो.
SBI च्या ग्राहकांना महिनाभरात दुसरा झटका; कर्जाचा EMI आणखी वाढणार, काय आहे कारण?
कर सवलत
आरपीएस ग्रुपचे पार्टनर सुरेन गोयल म्हणतात की, जेव्हा तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेता तेव्हा तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80 अंतर्गत कर सूटही मिळते. गृहकर्ज घर खरेदी करणाऱ्यांना विविध प्रकारच्या कर सवलत मिळतात. जेव्हा एखादा तरुण अंडर कन्स्ट्रक्शन घरात गुंतवणूक करतो तेव्हा तो प्री कन्स्ट्रक्शन व्याजातून सूट मिळवू शकतो आणि त्याला गृहकर्जावर भरलेल्या व्याजावर सूट मिळण्याचाही हक्क आहे.
स्वतःची मालमत्ता
अवंत इंडियाचे एमडी नकुल माथूर सांगतात की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात घर विकत घेतले तर ते भविष्यासाठी मोठा आधार आहे. नंतर काही आर्थिक संकट आल्यास घरावर कर्ज घेता येते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही प्लॉट खरेदी केला असेल तर 10-15 वर्षांनी तो जबरदस्त परतावा देतो.
शेतकऱ्यांना वाट पाहण्याची गरज नाही, ‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता
भाड्याची बचत
गोयल गंगा डेव्हलपमेंट्सचे एमडी अनुज गोयल म्हणतात की, जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेत असाल, तर तुम्ही भाड्याने देत असलेल्या पैशात थोडीशी रक्कम जोडून, ते ईएमआय म्हणून भरून तुमची संपत्ती वाढवू शकता. तुमच्या गृहकर्जाची रक्कम कालांतराने कमी होते आणि तुम्ही लवकरच तुमच्या घराचे मालक बनता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.