Home /News /money /

शेतकऱ्यांना वाट पाहण्याची गरज नाही, ‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता

शेतकऱ्यांना वाट पाहण्याची गरज नाही, ‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता

PM kisan yojana: तुम्हीदेखील पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि या योजनेचा हप्ता वेळेवर तुमच्या खात्यात जमा व्हावा, अशी तुमची इच्छा असेल तर ई-केवायसी पूर्ण करून घ्या.

मुंबई, 16 मे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजना (PM Kisan Samman Nidhi) ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून केंद्र सरकारने सुरू केलेली एक विशेष योजना आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी (Farmers) कुटुंबांना दर चार महिन्यांनी 2000 रुपये मिळतात. म्हणजेच दरवर्षी 6000 रुपये मिळतात. दरवर्षी एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये पैसे उपलब्ध करून दिले जातात. आर्थिक मदतीची गरज असलेल्या अशा शेतकरी कुटुंबांना मदत म्हणून डिसेंबर 2018 मध्ये पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली होती. दरम्यान, या योजनेतले सर्व पात्र शेतकरी सध्या पीएम किसान सन्मान निधीच्या 11 व्या हप्त्यातल्या 2000 रुपयांची वाट पाहत आहेत. PM किसान निधीसाठी देशभरातल्या 12.5 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 11 वा हप्ता येण्यापूर्वी सरकारने ई-केवायसी (e-KYC) करणं बंधनकारक केलं आहे. केवायसीसाठी आधी 31 मार्च ही डेडलाईन देण्यात आली होती; मात्र आता ती 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. या संदर्भातलं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने दिलं आहे. SBI च्या ग्राहकांना महिनाभरात दुसरा झटका; कर्जाचा EMI आणखी वाढणार, काय आहे कारण? साधारणपणे 1 एप्रिल ते 31 जुलैदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा केला जातो. यासाठी आतापर्यंत 80 टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. शेतकऱ्यांची 11व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 31 मे पर्यंत 11 वा हप्ता जमा होऊ शकतो, असा दावा सूत्रांनी केला आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलं नसेल, त्यांनी ते लवकरात लवकर करून घ्यावं. यंदाचा हप्ता उशिरा गेल्या वर्षीच्या रेकॉर्डच्या आधारे यंदाची तुलना केल्यास या वेळी हप्त्याला उशीर झाला आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै या काळातला हप्ता 15 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. परंतु, या वेळी उशीर झाला असून 31 मे पर्यंत हप्ता येणं अपेक्षित आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत देशभरातल्या 12.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेलं नाही, त्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार नाहीत, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तरुणांनी करिअरच्या सुरुवातीलाच घर घरेदी करावं का? काय होईल फायदा? तज्ज्ञांचं मत जाणून घ्या ई-केवायसी कसं करायचं? >> ई-केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. >> तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्‍यात e-KYC चा पर्याय दिसेल. >> तुम्हाला या e-KYC वर क्लिक करावं लागेल. >> आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. >> यानंतर तुम्हाला इमेज कोड टाकावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावं लागेल. >> नंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि OTP भरावा लागेल. >> यानंतर, तुमची सर्व माहिती पूर्णपणे बरोबर असल्यास ही eKYC प्रक्रिया पूर्ण होईल. >> तुमची प्रक्रिया चुकली असेल तर invalid असं स्क्रीनवर येईल. >> चुकलेली किंवा अवैध माहिती तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊन दुरुस्त करवून घेऊ शकता. तुम्हीदेखील पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि या योजनेचा हप्ता वेळेवर तुमच्या खात्यात जमा व्हावा, अशी तुमची इच्छा असेल तर ई-केवायसी पूर्ण करून घ्या.
First published:

Tags: Farmer, Money, PM Kisan

पुढील बातम्या