मुंबई, 2 जून: म्हाडाच्या मुंबईतील 217 घरांसाठी आज सोडत काढली जात आहे. प्रथम विजेते बनण्याचा मान राशी कांबळे यांना मिळाला. गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते सोडत काढली. या घरांसाठी 66,011 जणांनी अर्ज दाखल केले होते. या सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या वेबसाईटवरून केलं जात आहे. या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी सहकारनगर, चेंबूर इथल्या 170 आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 47 घरांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटासाठी 53 हजार 455 आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 12 हजार 636 अर्ज दाखल झाले आहेत. या दोन्ही गटांत अनुक्रमे सुमारे 106 कोटी आणि 37 कोटी इतकी अनामत रक्कम जमा झाली आहे. म्हाडाच्या घरांची लॉटरी कशी पाहाल. https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Mumbai/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही लॉटरी पाहू शकता. इथे गेल्यानंतर लॉटरी लिस्टवर किंवा ड्रॉ लॉटरीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पाहाता येणार आहे. याशिवाय लॉटरीचे लॉट जसे पूर्ण होतील त्यानुसार संपूर्ण यादी तुम्ही याच संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता VIDEO: धक्कादायक! रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरमागे धावल्या महिला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







