मुंबई,13 जानेवारी- आपण नवीन फोन घेतला की जुना फोन एक तर विकतो, किंवा तो फोन खूपच जुना असेल आणि विकून चांगली किंमत येणार नसेल तर तो घरात पडून राहतो. पण कपाटात कुठेतरी पडून असलेला तो फोन तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. हो तुम्ही बरोबर ऐकलंय. जुन्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही चांगली कमाईदेखील करू शकता. तसंच यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून दर महिन्याला तुमच्या त्या फोनच्या माध्यमातून चांगले पैसे कमवू शकता. जुन्या फोनच्या मदतीने पैसे कसे कमवायचे, तुम्ही फोन वापरून कोणती कामं करू शकता, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय.
गेम टेस्टरचं काम करून कमवता येतील पैसे
गेम टेस्टरचं कामही खूप चांगलं आहे. बरेच लोक यातूनही खूप जास्त पैसे कमवत आहेत. पण यासाठी सर्वांत आधी तुम्हाला गेम टेस्टिंगसाठी अर्ज करावा लागेल. या शिवाय तुमच्याकडे चांगलं गेमिंग स्किलदेखील असणं आवश्यक आहे. कारण तुमचं गेमिंग स्किल जितके चांगलं असेल तितके जास्त पैसे तुम्ही गेम टेस्टिंगमधून कमवू शकाल. तसंच गेम टेस्टर म्हणून काम करताना तुमचा ऑनलाइन गेम खेळण्याचा छंदही पूर्ण होईल.
(हे वाचा:बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवून त्यांच्यावर करतो करोडोंचा खर्च )
सर्व्हे करून कमाई
अनेक राजकीय पक्ष कोणत्याही निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण करतात. अशा सर्वेक्षणांसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. खरं तर हे सर्वेक्षणदेखील सहजपणे ऑनलाइन केलं जाऊ शकतं. हे करण्यासाठी, तुम्ही ऑनलाइन सर्वेक्षणांमध्येदेखील भाग घेऊ शकता. सर्वेक्षण करण्यासाठी तुम्ही तुमचा जुना फोन वापरू शकता. हे करण्यासाठी तुम्हाला हाय-स्पीड स्मार्टफोनची गरज नाही. जुन्या स्मार्टफोनच्या मदतीने सर्वेक्षणात सहभागी होऊन तुम्ही पैसे कमवू शकता.
Youtube वरून कमाई
युट्यूबच्या मदतीने तुम्ही चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला YouTube व्हिडिओ कसे तयार करायचे आणि अपलोड करायचे हे माहीत असणं आवश्यक आहे. ते माहीत असल्यास तुमच्यासाठी त्यातून कमाई करणं खूप सोपं होतं. कारण व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोन लागेल. पण यासाठी तुम्ही जुन्या स्मार्टफोनचीही मदत घेऊ शकता. हे करण्यासाठी तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. जुन्या फोनचा वापर करून व्हिडिओ शूट व एडिट करून तुम्ही युट्यूबवर अपलोड करू शकता. त्यातून तुम्हाला कमाई करता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smart phone, Technology