Home /News /money /

कोरफडची शेती करा आणि मिळवा लाखोंचा नफा, सोबत करा असा जोडव्यवसाय

कोरफडची शेती करा आणि मिळवा लाखोंचा नफा, सोबत करा असा जोडव्यवसाय

अनेक लोकांना खाजगी जॉब करण्यात अजिबात रस नसतो. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. मात्र कोणता व्यवसाय करावा हा सर्वात मोठा प्रश्न असतो? आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहोत.

    मुंबई, 23 मार्च: अनेक लोकांना खाजगी जॉब करण्यात अजिबात रस नसतो. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. मात्र  कोणता व्यवसाय करावा हा सर्वात मोठा प्रश्न असतो? आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही मोठी कमाई करू शकता. हा व्यवसाय म्हणजे कोरफडची शेती. देशासोबतच विदेशातसुद्धा कोरफडची मागणी वाढली आहे. अलिकडे सौंदर्यप्रसाधने तसेच खाद्यपदार्थंमध्ये कोरफड वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरफडच्या गुणधर्म सगळ्यांनाचं माहिती आहे. भारतात मोठ्या प्रमाणात कोरफडची शेती केली जाते. लघुद्योगानंपासून ते मोठ-मोठ्या उद्योग कंपन्या कोरफडच्या उत्पादनांची विक्री करून करोडो रुपयांचा नफा मिळवत आहेत. आणि यात तुम्ही कोरफडची शेती करून लाखो रुपये कमवू शकता. व्यवसायाच्या दोन पद्धती कोरफडचा व्यवसाय तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. एक म्हणजे कोरफडची शेती करू शकता. आणि दुसरं म्हणजे कोरफडचं ज्यूस काढण्यासाठी किंवा पावडर करण्यासाठी मशीन बसवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही लाखो रुपये मिळकत करू शकता. या व्यवसायामध्ये गुंतवणूक कमी आणि मिळकत जास्त आहे. कोरफडची शेती फक्त 50 हजारांची गुंतवणूक करून, तुम्ही कोरफडची शेती सुरु करू शकता. हा कोरफड तुम्ही जवळच्या उत्पादन निर्मित करणाऱ्या कंपनीमध्ये किंवा मार्केटमध्ये विक्री करू शकता. त्याचबरोबर व्यवसाय वाढवण्याचा विचार असेल, तर तुम्ही प्रोसेसिंग मशीन बसवून उत्पादन निर्मितीसुद्धा करू शकता. प्रोसेसिंग प्लँट यामध्ये तुम्ही कोरफड प्रोसेसिंग प्लान्ट बसवू शकता. त्यातून कोरफड ज्यूस, जेल, पावडर अशा विविध उत्पादनांची निर्मिती करू शकता. यासाठी तुम्हाला 3 ते 5लाखांची गुंतवणूक आवश्यक असते. (हे वाचा:  या व्यवसायात पहिल्या महिन्यापासूनच होईल बक्कळ कमाई; सरकारकडूनही मिळेल मदत) या गोष्टींमध्ये खर्च करावा लागेल कोरफडच्या शेतीमध्ये तुम्हाला साहित्य, प्लान्ट, खाद्य, हार्वेस्टिंग, कामगार, या गोष्टींवर खर्च करावा लागणार आहे. देशात एका वेळी कोरफडची शेती करून, त्यात 3 ते 5 वर्षांपर्यंत उत्पादन घेतलं जातं. लाखोंचा नफा कोरफडच्या शेतीमध्ये तुम्ही 50 ते 60 हजार गुंतवूण 4 ते 5 लाखांचा नफा मिळवू शकता. त्याचबरोबर कमी पैशांमध्ये कोरफड साबणासारखा दुय्यम व्यवसायही करू शकता. कॉस्मेटिक, मेडिकल इतर वैद्यकीय क्षेत्रात कोरफडचं वापर वाढला आहे. त्याचबरोबर ग्राहक आयुर्वेदिक अशा कोरफडच्या उत्पादनांना मोठी पसंती दर्शवतात.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Aloe vera, Money, Tree plantation

    पुढील बातम्या