Home /News /money /

Business Idea: पेट्रोल-डिझेल ऑनलाईन विक्रीचा व्यवसाय सुरु करा, वर्षभरात कोट्यवधींची उलढाल शक्य

Business Idea: पेट्रोल-डिझेल ऑनलाईन विक्रीचा व्यवसाय सुरु करा, वर्षभरात कोट्यवधींची उलढाल शक्य

Business Idea: पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) घरोघरी विकण्याचा व्यवसाय करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. पेट्रोल आणि डिझेलची ऑनलाइन विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला स्वत:चं अॅप किंवा वेबसाइट तयार करावी लागेल.

    मुंबई, 17 मे : देशात वाहनांची संख्या जशी वाढतेय तशी पेट्रोल डिझेलची (Petrol-Diesel) मागणी सातत्याने वाढत आहे. त्यात आज काल सर्वच वस्तू ऑनलाईन उपलब्ध होत असताना इंधनही त्यात मागे नाही. तुम्हालाही ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे (E-commerce Companies) तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही पेट्रोल-डिझेलची ऑनलाईन विक्री (Petrol-Diesel Online Sale) सुरू करू शकता आणि त्याची होम डिलिव्हरी सुरू करू शकता. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या ऑनलाईन डिस्ट्रिब्युशनचा (Online Oil Distribution) व्यवसाय करणे पूर्वी खूप कठीण होते. 2016 पर्यंत भारतात पेट्रोल डिलिव्हरीला परवानगी नव्हती. यानंतर सरकारने पेट्रोल-डिझेलच्या ऑनलाईन डिस्ट्रिब्युशनला परवानगी दिली आहे. तुम्हालाही पेट्रोल-डिझेल विक्रीचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही पेट्रोल-डिझेलच्या होम डिलिव्हरीसाठी ऑनलाईन बुकिंग करू शकता. पेट्रोल-डिझेल घरोघरी विकण्याचा व्यवसाय करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. पेट्रोल आणि डिझेलची ऑनलाइन विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला स्वत:चं अॅप किंवा वेबसाइट तयार करावी लागेल. तुम्ही ऑनलाइन किंवा मेसेजद्वारे पेट्रोल डिलिव्हरी ऑर्डर करू शकता. ICICI बँकेकडून पुन्हा एकदा FD व्याजदरात वाढ; 20 बेसिक पॉईंटपर्यंत वाढ, तुम्हाला कसा होईल फायदा दुचाकी किंवा कार चालवणाऱ्या लोकांना अनेकदा अशा त्रासाला सामोरे जावे लागते की त्यांचे पेट्रोल अचानक संपते आणि जवळपास एकही पेट्रोल पंप दिसत नाही. अशा वेळी ही ऑनलाईन इंधन पुरवठा करणारी सेवा कामी येते. ऑनलाईन इंधन विक्रीचा व्यवसाय कसा सुरु करायचा? तुम्हालाही पेट्रोल-डिझेलच्या होम डिलिव्हरीचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन किंवा भारत पेट्रोलियमसारख्या कंपन्यांची मदत घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या होम डिलिव्हरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, आपण प्रथम ऑईल मार्केटिंग कंपन्यांशी संपर्क साधला पाहिजे. CIBIL Score कमी असला तरी घेता येईल पर्सनल लोन, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच ऑईल मार्केटिंग कंपन्या तुमच्या पेट्रोल-डिझेल विक्री प्रकल्पाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (Project Report) मागतात. जर तुमचा डीपीआर ऑईल मार्केटिंग कंपन्यांना आवडला असेल तर तुम्ही पेट्रोल आणि डिझेलची होम डिलिव्हरी करण्याची परवानगी मिळवू शकता. यासाठी किमान प्रमाण निश्चित केले असले तरी, कोणताही ग्राहक निर्धारित प्रमाणापेक्षा कमी पेट्रोल आणि डिझेल मागवू शकत नाही. नोएडामधील एका ऑईल डिस्ट्रिब्युशन स्टार्टअपने काही दिवसांपूर्वी काम सुरू केले. स्टार्टअपच्या संस्थापकाने सांगितले की, पेट्रोल-डिझेलचा होम डिलिव्हरी व्यवसाय सुरू करण्यासाठी घरोघरी जाऊन लोकांशी बोलून ऑनलाइन फीडबॅक घेतला. अशा कंपनीचा पेट्रोल-डिझेलच्या होम डिलिव्हरीचा व्यवसाय 1 वर्षात 100 कोटींच्या पार सहज जाऊ शकतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Business News, Money, Petrol and diesel, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या