शिखा श्रेया रांची: आजही आपल्या देशातील महिलांसाठी घराबाहेर पडून काम करणं हे मोठं आव्हान आहे. पण, म्हणतात ना ‘गरज ही शोधाची जननी असते’. याच उक्तीनुसार, जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा सर्वात मोठं आव्हानदेखील सोपं वाटतं. झारखंडची राजधानी रांची येथील रहिवासी असलेल्या आशा सिन्हा यांच्याबाबत हेच घडलं. त्या एकेकाळी पाच हजार रुपये पगाराची नोकरी करायच्या. पण, आर्थिक गरज असल्यामुळे त्यांनी ज्यूट (ताग) व्यवसायामध्ये प्रवेश केला. सध्या त्या लाखो रुपये उलाढाल असलेला व्यवसाय करत आहेत. आशा सिन्हा यांनी न्यूज 18 लोकला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये सांगितलं की, एक काळ असा होता की, आर्थिक परिस्थिती फार बिकट होती. मग, मी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ज्यूट व्यवसाय सुरू करून आता 12 वर्षे झाली आहेत. यादरम्यान अनेक आव्हानं आली. पण, त्यांचा धीरानं सामना केला. त्याचाच परिणाम म्हणून आज मी माझं संपूर्ण कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे.
दुर्मीळ आजारानं सतत हात थरथरतात! तरीही अक्षय कसा बनला फोटोग्राफर? पाहा Photosमार्केटचा अभ्यास ज्यूटपासून अनेक प्रकारच्या पिशव्या बनवायला सुरुवात केल्याचं आशा सांगतात. त्या पूर्वी, मार्केटचा अभ्यास केला. या व्यवसायातील मर्यादा आणि ताकद चांगल्या प्रकारे समजून घेतली. आमच्या लक्षात आलं की, रांचीमध्ये विकण्यासाठी ज्यूटच्या पिशव्या कोलकात्याहून घाऊक दरानं विकत घ्याव्या लागतात. लहान विक्रेत्यांसाठी कोलकात्याहून 20 ते 25 पिशव्या आणणं कठीण होतं. त्यामुळे या गोष्टीचा फायदा घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि ज्यूटच्या पिशव्या बनवायला सुरुवात केली. जे व्यापारी कोलकात्यातून ज्यूटच्या पिशव्या आणायचे ते व्यापारी आता आमच्याकडून त्याच दर्जाच्या पिशव्या खरेदी करत आहेत. ज्यूटची एक हजार प्रॉडक्ट्स आशा म्हणाल्या, हे काम मी एकटीनं सुरू केलं होतं. हळूहळू त्यात आणखी महिला सहभागी झाल्या. सध्या एकूण 300 महिल्या एकत्र काम करत आहेत. आम्ही एक हजारपेक्षा जास्त प्रकारची ज्यूट उत्पादनं तयार करतो. आमच्याकडे कॉन्फरन्स बॅग, पहाडिया बॅग, सेमिनार बॅग, स्कूल बॅग, वुमन पर्स, वुमन साईड बॅग, छोटी पर्स, भाजी बॅग अशा विविध प्रकारच्या बॅग आहेत.
स्वच्छ लातूरसाठी झटणारे हात, 200 महिला करतायत मोठं काम! Videoदिल्लीपासून बेंगळुरूपर्यंत मार्केटिंग आशा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी तयार केलेली उत्पादनं झारखंड व्यतिरिक्त दिल्ली, बेंगळुरू, सुरत, बिहार आणि यूपी ठिकाणी कुरिअरद्वारे पाठवली जातात. ज्याला त्याची गरज आहे तो फक्त त्यांना कॉल करतो. दर महिन्याला सुमारे दोन हजार ज्यूट उत्पादनं इतर शहरांमध्ये कुरिअरद्वारे वितरित केली जातात. आशा सांगतात की, या व्यतिरिक्त आमची उत्पादनं झारक्राफ्ट आणि कुसुम, पलाश लोकल मार्केट, रांचीतील घाऊक मार्केट आणि जत्रेत विकली जातात. तुम्हालाही आशा सिन्हा यांच्याकडील सुंदर ज्यूटच्या पिशव्या घ्यायच्या असतील तर 8340117920 या क्रमांकावर कॉल करून तुम्ही ऑर्डर करू शकता.