जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / स्वच्छ लातूरसाठी झटणारे हात, 200 महिला करतायत मोठं काम! Video

स्वच्छ लातूरसाठी झटणारे हात, 200 महिला करतायत मोठं काम! Video

स्वच्छ लातूरसाठी झटणारे हात, 200 महिला करतायत मोठं काम! Video

लातूर शहराला स्वच्छ ठेवण्याचे काम जनाधार ही संस्था करते. शहरातून रोज 35 ते 50 टन कचऱ्याचे संकलन होते.

  • -MIN READ Latur,Maharashtra
  • Last Updated :

    ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 15 फेब्रुवारी: आपले शहर स्वच्छ सुंदर असावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. शहरांच्या स्वच्छतेसाठी शासनाकडूनही विविध उपक्रम राबविले जात असतात. पण खऱ्या अर्थाने शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याचे काम काही मोजकेच हात करत असतात. लातूर येथे शहराला कचरामुक्त करुन शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याचे काम जनाधार संस्था करत आहे. लातूरच्या स्वच्छतेला खऱ्या अर्थाने जनाधारचा आधार मिळाला आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    रोज 35 ते 50 टन कचऱ्याचे संकलन जनाधार या संस्थेच्या माध्यमातून लातूर शहरातील सुमारे 35 ते 50 टन कचऱ्याचे दररोज संकलन करण्यात येते. लातूर शहरातून दररोज साधारणत: 35 ते 50 टन संकलीत करण्यात येतो. यातील सुक्या कचऱ्याचे जनाधार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून 6 वेगवेगळ्या केंद्रावर पाठवला जातो. त्याचे 20 वेगवेगळ्या प्रकारात विलीगीकरण करुन त्यावर प्रक्रिया करण्यात येते. तर ओल्या कचऱ्याचीही योग्य ती विल्हेवाट लावली जाते. लातूर शहराला स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी 200 महिला या कामात कार्यरत आहेत. कचरा संकलन व त्यावर प्रक्रिया करण्याच्या कामातून महिलांना रोजगार उपलब्ध होवून त्यांचे जीवनमान उंचविण्याचे काम ही करण्यात येते. रोज 21 किलो मीटर धावणाऱ्या तरूणाचा कशासाठी सुरू आहे संघर्ष? Video नागरिकांचाही सहभाग आवश्यक आपले शहर स्वच्छ सुंदर ठेवून नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन मिळावे, या उद्देशाने जनाधार संस्था व त्यांचे कर्मचारी कठिबद्ध आहेत, असे जनाधार संस्थेचे प्रकल्प समन्वयक नंदकुमार बिजालगावकर सांगतात. शहराला कचरामुक्त करावयाचे असेल तर काही मोजक्याच हातांवर विसंबून न राहता नागरिकांनीही आपला खारीचा वाटा उचलावा. घरातूनच ओला आणि सुका कचरा वेगळा करून द्यावा. रस्त्यावर कचरा फेकण्याऐवजी कचरा कुंडीतच कचरा टाकावा. स्वच्छ व सुंदर शहर ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर सर्वांची जबाबदारी आहे. या भावनेतून नागरिकांनीही स्वच्छतेसाठी प्रयत्न केल्यास आपले शहर नक्कीच स्वच्छ सुंदर होईल. तसेच ते आरोग्यदायीही बनेल यात शंका नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: latur , Local18
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात