जाणून घ्या BSNL च्या स्वस्त प्लॅनबाबत, 94 रुपयांमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी, कॉलिंग आणि डेटा

जाणून घ्या BSNL च्या स्वस्त प्लॅनबाबत, 94 रुपयांमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी, कॉलिंग आणि डेटा

बीएसएनएलच्या या रिचार्जची किंमत 94 रुपये आहे, ज्यामध्ये ग्राहकांना एकूण 90 दिवसांपर्यंतची वैधता दिली जाते. हा प्लॅन अ‌ॅक्टिव झाल्यानंतर आपल्याला 3 जीबी डेटा वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. हा डाटा 90 दिवसांमध्ये कधीही वापरू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मे :  टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी एका पेक्षा एक चांगली ऑफर आणत आहेत. सध्या अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्याने लोकांच्या इंटरनेट डेटाची गरज वाढली असून कॉलिंगही जास्त गरजेचे बनले आहे. कमी किंमतीत चांगल्या ऑफर शोधत असाल तर बीएसएनएलच्या (BSNL) योजना खूप चांगला पर्याय म्हणून तुमच्या समोर आहेत. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त रिचार्ज योजना (Best Recharge Plan) आणत असते, ज्यामध्ये डेटा आणि कॉलिंगचा लाभ दिला जातो. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशा योजनांची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला कमी किंमतीच्या रिचार्ज योजनेत डेटाची आणि दीर्घ मुदतीसह कॉल करण्याचा प्लॅन मिळेल.

बीएसएनएलच्या या रिचार्जची किंमत 94 रुपये आहे, ज्यामध्ये ग्राहकांना एकूण 90 दिवसांपर्यंतची वैधता दिली जाते. हा प्लॅन अ‌ॅक्टिव झाल्यानंतर आपल्याला 3 जीबी डेटा वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. हा डाटा 90 दिवसांमध्ये कधीही वापरू शकता. खास गोष्ट म्हणजे हा प्लॅन डेटासह ग्राहकांना कॉलिंग बेनिफिट्स देतो. डेटा बरोबरच कॉलिंगही मिळत असल्याने आपल्याला कॉलिंगसाठी वेगळ्या प्लॅनची गरज भासणार नाही

हे वाचा - ‘सगळे पुरुष सारखेच असतात’; पत्नीनं सांगितली शाहिद कपूरची वाईट सवय

विनामूल्य कॉलिंगचा लाभ मिळेल

ग्राहकांना या योजनेत विनामूल्य कॉलिंगचा लाभ दिला जातो. म्हणजेच, ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर 90 दिवस 100 मिनिट विनामूल्य व्हॉईस कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर त्यांना कॉल करण्यासाठी सामान्य फी आकारली जाईल.

हे वाचा - Vaccineसाठी इतर राज्यांनी चेक दिले पण महाराष्ट्राने नाही; बीएमसीकडे अफाट पैसा तो खर्च करून लस विकत घ्यावी : भाजपचं CMला आवाहन

या व्यतिरिक्त आपल्याला कॉलर ट्युनही मोफत मिळू शकते, त्यासाठी BSNL चे अॅप डाउनलोड करून पीआरबीटी डीफॉल्ट ट्यून देखील या योजनेत 60 दिवसांसाठी विनामूल्य असेल. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना केवळ विद्यमान बीएसएनएल ग्राहकांना उपलब्ध आहे, जे लोक नवीन कनेक्शन घेतात त्यांना ही योजना मिळणार नाही.

Published by: News18 Desk
First published: May 8, 2021, 6:08 PM IST

ताज्या बातम्या