मराठी बातम्या /बातम्या /मनी /

BSNL आणि BBNL या महिन्यात होणार विलीन! काय आहे केंद्र सरकारची योजना?

BSNL आणि BBNL या महिन्यात होणार विलीन! काय आहे केंद्र सरकारची योजना?

भारत सरकार ब्रॉडबँड कॉर्पोरेशन लि. (BBNL) तोट्यात चाललेली सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये विलीन होण्याची तयारी करत आहे.

  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 20 मार्च : BSNL आणि BBNL या महिन्यात विलीन होणार आहेत. केंद्र सरकारने ही योजना तयार केली आहे. भारत सरकार ब्रॉडबँड कॉर्पोरेशन लि. (BBNL) तोट्यात चाललेली सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये विलीन होण्याची तयारी करत आहे. ही माहिती देताना बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवार म्हणाले की, हे विलीनीकरण याच महिन्यात होणार आहे. ऑल इंडिया ग्रॅज्युएट इंजिनीअर्स अँड टेलिकॉम ऑफिसर्स असोसिएशन (एआयजीटीओए) द्वारे आयोजित नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले की सरकार बीएसएनएलला बदलण्याची संधी देत ​​आहे.

अदानींचं नाव खरेदीदारांमध्ये येताच हा स्टॉक बनला रॉकेट! तुमच्याकडे आहे का?

पुरवार यांनी अलीकडेच एआयजीटीओए (AIGTOA) च्या अखिल भारतीय परिषदेत सांगितले की, "सरकारने BBNL चे BSNL मध्ये विलीनीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. म्हणजे अखिल भारतीय स्तरावर BBNL चे सर्व काम BSNL कडे जाणार आहे.

केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांसोबत झालेल्या भेटीचा संदर्भ देत पुरवार म्हणाले की, यासंदर्भात त्यांची तासभर बैठक झाली. बीएसएनएलकडे आधीपासून 6.8 लाख किमी पेक्षा जास्त ऑप्टिकल फायबर केबलचे (OFC) नेटवर्क आहे.

First published:

Tags: BSNL