Home /News /money /

Bitcoin, Ethereum, Dogecoin सारख्या क्रिप्टोकरन्सी 6 महिन्यात अर्ध्यावर; गुंतवणूकदारांनी आता काय करावं?

Bitcoin, Ethereum, Dogecoin सारख्या क्रिप्टोकरन्सी 6 महिन्यात अर्ध्यावर; गुंतवणूकदारांनी आता काय करावं?

बिटकॉइनमध्ये (Bitcoin) नोव्हेंबरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर यावेळी तुमची गुंतवणूक जवळपास 55 हजार रुपयांपर्यंत खाली आली असती. Dogecoin आणि Cardano सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्येही पैसे अर्ध्याहून कमी झाले आहेत.

    मुंबई, 7 मे : क्रिप्टोकरन्सीतून (Cryptocurrency) अनेकजण करोडपती बनले असल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचत असाल. असं असलं तरी क्रिप्टोकरन्सी हे जगातील सर्वात धोकादायक गुंतवणूक माध्यमांपैकी (Investment Options) एक आहे. कुणी किती पैसे यातून कमावले या बातम्या तुम्ही वाचता, पण किती लोकांचे लाखो-कोटी रुपये बुडाले हेही कळायला हवे. गुंतवणुकीत किती नफा आहे हे जाणून घेण्यासोबतच त्यात किती जोखीम आहे हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्ये (Bitcoin) नोव्हेंबरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर यावेळी तुमची गुंतवणूक जवळपास 55 हजार रुपयांपर्यंत खाली आली असती. Dogecoin आणि Cardano सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्येही पैसे अर्ध्याहून कमी झाले आहेत. बिटकॉइन 36,000 च्या खाली आज, शनिवारी, 7 मे रोजी, एका बिटकॉइनची किंमत 35820 डॉलर प्रति कॉईन आहे. त्याच वेळी, 6 महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये, बिटकॉइनचा दर 60,000 डॉलरच्या वर होता. 8 नोव्हेंबर रोजी एका बिटकॉइनची किंमत 67,000 डॉलरच्या वर होती. म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या दरानुसार आज 6 महिन्यांनंतर बिटकॉइनची किंमत जवळपास निम्म्यावर आली आहे. EPFO व्याजाच्या पैशांसाठी यावर्षी वाट पाहावी लागणार नाही? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना पैसे लवकर मिळण्याची शक्यता इथरियम देखील अर्धा झाला बहुतेक प्रमुख क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीतही असेच आहे. इथरियम (Ethereum) या दुसऱ्या प्रमुख चलनाचीही स्थिती बिकट आहे. गेल्या 6 महिन्यांत इथरियम 42 टक्क्यांनी घसरला आहे. आज 7 मे रोजी इथरियमची किंमत प्रति कॉईन 2661 डॉलरवर जात आहे, 6 महिन्यांपूर्वी 4800 डॉलरवर होती. अलिबाबा कंपनीला नावाच्या गोंधळामुळे मोठा फटका; काही मिनिटात 26 अब्ज डॉलर्सचा फटका Dogecoin अर्ध्याहून कमी लेव्हलवर Dogecoin ची स्थिती आणखी वाईट आहे. गेल्या 6 महिन्यांत Dogecoin 52 टक्क्यांहून अधिक घसरले आहे. आज Dogecoin ची किंमत 0.13 डॉलरवर सुरु आहे, जी 6 महिन्यांपूर्वी 0.28 डॉलरवर व्यापार करत होती. कार्डानोची परिस्थिती आणखीनच बिकट आहे. कार्डानोच्या किमतीत गेल्या 6 महिन्यांत 61 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. आज 7 मे रोजी कार्डानोची किंमत 0.77 डॉलर आहे, जी 6 महिन्यांपूर्वी 2.25 डॉलरवरून व्यापार करत होती. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गुंतवणूक करताना रिस्क-रिवॉर्ड रेशो हे आधी पाहिले पाहिजे. क्रिप्टोकरन्सीसारखी रिस्की गुंतवणूक अत्यंत काळजीपूर्वक करावी. जर तुम्ही पैसे गुंतवत असाल तर तुमच्या भांडवलाचा थोडासा भागच गुंतवा. इतके पैसे गुंतवा की ते बुडाले तरी तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा. क्रिप्टो सारख्या मालमत्तेत तुमच्या भांडवलाच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक करणे हे योग्य धोरण असेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Cryptocurrency, Digital currency, Investment, Money

    पुढील बातम्या