जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पैसे तयार ठेवा! मोठी कंपनी भारतात IPO लाँच करण्याच्या तयारीत

पैसे तयार ठेवा! मोठी कंपनी भारतात IPO लाँच करण्याच्या तयारीत

पैसे तयार ठेवा! मोठी कंपनी भारतात IPO लाँच करण्याच्या तयारीत

वॉलमार्ट ग्रुपची डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे आपले मुख्यालय सिंगापूरहून भारतात हलवण्याच्या तयारीत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : वॉलमार्ट ग्रुपची डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे आपले मुख्यालय सिंगापूरहून भारतात हलवण्याच्या तयारीत आहे. 3 ऑक्टोबर रोजी IPO सुरू करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने फोन पेचं कार्यालया भारतात आणण्याची तयारी पूर्ण केली आहे. फोनपेकडून मिळालेल्या माहितीनुसार ही प्रक्रिया तीन टप्प्यात पूर्ण झाली आहे. सर्वप्रथम, गेल्या एका वर्षात, PhonePe ने PhonePe सिंगापूरचे सर्व व्यवसाय आणि उपकंपन्या थेट PhonePe Pvt Ltd (India) कडे हस्तांतरित केल्या आहेत. यामध्ये विमा ब्रोकिंग आणि संपत्ती ब्रोकिंग सेवांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना सध्याच्या ESOP ला फोनपे इंडियाच्या नव्या योजनेंतर्गत ESPO जारी करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. नव्या नियमांनुसार IndusOS Appstore चं स्वामित्व संगापूरहून भारतात ट्रान्सफर करण्यात आलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

को फाउंडर आणि CEO समीर निगम यांनी महत्त्वाची माहिती CNN News 18 ला दिली. कंपनीने आपली रजिस्टर्ड यूनिट सिंगापूरहून भारतात हलवण्याची तयारी पूर्ण केली आहे. आम्ही एक मेड इन इंडिया कंपनी आहोत. आता आम्ही शेअर मार्केटमध्ये योगदान देऊ शकतो. बोर्डाने योजनांवर मंजुरीही दिली आहे. त्यामुळे आगामी काळात IPO येण्याचे संकेत कंपनीकडून मिळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात