मुंबई, 11 जुलै : शेअर बाजारात आज भारती एअरटेलच्या स्टॉकमध्ये (Bharti Airtel Share Price) जोरदार घसरण पाहायला मिळाली. भारती एअरटेलमधील शेअर्समध्ये विक्रीचं कारण म्हणजे अदानी समूहाची (Adani Group) टेलिकॉम सेक्टरमधील प्रवेश आहे. भारती एअरटेलच्या शेअमध्ये जवळपास 5 टक्क्यांनी घसरण दिसत आहे. आज हा शेअर 5 टक्क्यांनी घसरून 661 रुपयांवर आला आहे. सध्या भारती एअरटेल 662 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. अदानी समूह 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभागी होणार आहे, त्यानंतर असे मानले जाते की दूरसंचार क्षेत्र पुन्हा शर्यत सुरू होईल. रिलायन्स जियोने या क्षेत्रात (Reliance Jio) प्रवेश केल्यानंतर आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. यामुळेच भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर जवळपास सपाट व्यवहार करत असला तरी रिलायन्सच्या शेअरमध्येही 0.58 टक्क्यांची किंचित घट झाली आहे. मात्र व्होडाफोन आयडियाच्या शेअरवर यामुळे काहीही परिणाम झाला नाही. व्होडाफोन आयडियाचा शेअर वाढताना दिसत आहे. व्होडाफोन आयडिया 3.57 टक्क्यांच्या वाढीसह 8.75 रुपयांवर व्यवहार करत आहे. फुकटात पाहा सिनेमे, वेब सीरिज, टीव्ही शोज्; फक्त ‘हे’ अॅप्स डाऊनलोड करावे लागतील 5G स्पेक्ट्रमचा लिलाव 26 जुलै 2022 पासून सुरू होणार आहे. सध्याच्या तिन्ही दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया या बोलीमध्ये सहभागी होणार आहेत. मात्र अदानी समूह लिलावात सहभागी झाल्यानंतर दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा आणखी वाढणार आहे. मित्र-नातेवाईकांना कर्ज देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे पैसे बुडालेच समजा अदानी समूहाने लिलावात भाग घेण्याबाबत स्पष्ट केले की, ते सामान्य यूजर्ससाठी मोबाइल सेवेच्या क्षेत्रात प्रवेश करणार नाही. तर खाजगी नेटवर्क सोल्यूशन प्रोव्हाईड करणार आहेत. स्पेक्ट्रमचा वापर विमानतळावर तसेच त्यांचे बंदर, पॉवर ट्रान्समिशनच्या सायबर सिक्युरिटीसाठी केला जाईल. आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी खाजगी नेटवर्क म्हणून त्याचा वापर केला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.