मुंबई, 14 ऑगस्ट : भविष्य लक्षात घेऊन लोक अनेक प्रकारच्या विमा पॉलिसी घेतात. यामध्ये जीवन विम्यापासून ते आरोग्य विम्यापर्यंतचा समावेश होतो. आरोग्य विमा (Health Insurance benefits) तुम्हाला उपचाराचा खर्च भरून काढण्यात मदत करतो. यामुळे कुटुंबावर व सदस्यांवर आर्थिक बोजा पडत नाही. मात्र आता कोणता आरोग्य विमा घ्यावा याबाबत लोकांमध्ये चर्चा सुरू झाल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. बाजारात अनेक प्रकारच्या आरोग्य विमा योजना आहेत, ज्या लोक त्यांच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार निवडू शकतात. तज्ञांच्या मते, आरोग्य विमा योजना घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे आणि स्वतःसाठी योग्य आरोग्य विमा कवच निवडायला पाहिजे. यामुळं तुमच्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाची चिंता बर्याच प्रमाणात कमी होते. आरोग्य विम्यांतर्गत तुम्हाला आणखी अनेक फायदे होतात. आज आपण आरोग्य विमा का घ्यावा आणि त्याचे काय फायदे आहेत, हे जाणून घेऊया. आरोग्य विमा घेण्याचे 5 महत्त्वाचे फायदे महागाई वाढल्यानं उपचारही महाग होत आहेत. जर तुम्ही कोणत्याही गंभीर आजारासाठी किंवा सामान्य आजारांसाठी रुग्णालयात दाखल असाल तर या महागाईत तुमची बचत गमावू शकता. अशा परिस्थितीत आरोग्य आणीबाणीच्या काळात केवळ आरोग्य विमा कामी येतो. म्हणूनच तज्ञांनी शिफारस केली आहे की प्रत्येकानं आरोग्य विमा घ्यावा, कारण त्याची कधीही गरज भासू शकते. हेही वाचा- झपाट्याने वजन कमी झाल्यास दुर्लक्ष करू नका, डिप्रेशनसोबत कॅन्सरचाही वाढतो धोका
1. वैद्यकीय खर्च नियंत्रित होतो: आरोग्य विमा पॉलिसी तुम्हाला तुमच्या वैद्यकीय खर्चाची भरपाई करण्यास मदत करू शकते. हॉस्पिटलायझेशनपूर्वीच्या आणि त्यानंतरच्या खर्चासह वैद्यकीय खर्च वाढला तरी तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
2. उत्तम वैद्यकीय उपचार: आरोग्य विम्यामुळं तुम्हाला उत्तम दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळू शकतात. तसेच आरोग्य विम्यामुळे खर्चाची चिंता न करता तुम्ही तुमचे उपचार चांगल्या ठिकाणी मिळवू शकता. 3. हॉस्पिटलायझेशन खर्च: आरोग्य विमा पॉलिसीत 24 तासांपेक्षा जास्त काळ हॉस्पिटलायझेशनसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाचा समावेश होतो. यामध्ये खोलीचं भाडे, डॉक्टरांचे शुल्क, औषध शुल्क, निदान चाचणी शुल्क इत्यादींचा समावेश आहे. 4. हॉस्पिटलायझेशनपूर्वीचा आणि नंतरचा खर्च: यामध्ये हॉस्पिटलायझेशनपूर्वी कोणत्याही आजारावर झालेला वैद्यकीय खर्च तसेच डिस्चार्जनंतरच्या उपचारांच्या खर्चाचा समावेश होतो. पॉलिसी दस्तऐवज तयार केल्यावर काही दिवसांसाठी प्री-हॉस्पिटल आणि हॉस्पिटलायझेशन नंतरचा खर्च कव्हर केला जातो. 5. बचत सुरक्षित ठेवते: जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल आणि आरोग्य आणीबाणीच्या काळात अचानक ती गमावावी लागली तर तुमची सर्व बचत संपू शकते. पण जर तुमच्याकडे आरोग्य विमा असेल तर तुम्ही तुमची बचत करू शकता.