मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Net Banking चा वापर करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा बसेल आर्थिक फटका

Net Banking चा वापर करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा बसेल आर्थिक फटका

तुम्हीही नेट बँकिंगचे नियमित वापरकर्ते असाल, तर ते वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही मोठ्या इंटरनेट फसवणुकीचे (Online Fraud) बळी होऊ शकता.

तुम्हीही नेट बँकिंगचे नियमित वापरकर्ते असाल, तर ते वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही मोठ्या इंटरनेट फसवणुकीचे (Online Fraud) बळी होऊ शकता.

तुम्हीही नेट बँकिंगचे नियमित वापरकर्ते असाल, तर ते वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही मोठ्या इंटरनेट फसवणुकीचे (Online Fraud) बळी होऊ शकता.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 18 मार्च : गेल्या काही वर्षांत बँकिंग पद्धतीत (Banking System) मोठे बदल झाले आहेत. आता रोख रकमेसाठी बँकांबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहणे ही जुनी गोष्ट आहे. बहुतेक लोक आता नेट बँकिंगचा (Net Banking) वापर करत आहेत. नेट बँकिंगद्वारे काही मिनिटांत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. यासोबतच वेळेची बचत होण्यासही मदत होते.

तुम्हीही नेट बँकिंगचे नियमित वापरकर्ते असाल, तर ते वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही मोठ्या इंटरनेट फसवणुकीचे (Online Fraud) बळी होऊ शकता. आज तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुचवलेल्या काही उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचे पैसे सर्व प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित ठेवू शकता.

चुकीच्या लिंकवर क्लिक करु नका

इंटरनेटच्या फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, इंटरनेट वापरताना सुरक्षित आणि वेरिफाईड ब्राउझर वापरा. अनेक वेळा ग्राहक चुकीच्या लिंकवर क्लिक करतात आणि फसवणूक करणाऱ्याने तयार केलेला ब्राउझर वापरतात. अशा परिस्थितीत ते फसवणुकीचा बळी ठरतात.

Aadhar Card मध्ये वारंवार बदल करता येत नाही, वाचा कोणते बदल किती वेळा करता येतील?

पासवर्ड स्ट्राँग ठेवा

नेट बँकिंग वापरताना हे लक्षात ठेवा की तुम्ही नेट बँकिंगसाठी तयार केलेला पासवर्ड स्ट्राँग असावा. अनेक वेळा लोक त्यांच्या जन्मतारीख किंवा त्यांच्या नावानुसार सोपे पासवर्ड निवडतात. अशा परिस्थितीत पुढे ते फसवणुकीचा बळी ठरतात. त्यामुळे नेट बँकिंगसाठी पासवर्ड तयार करताना मजबूत पासवर्ड निवडा.

अॅप वेळोवेळी अपडेट करा

तुम्ही तुमच्या बँकेच्या अॅपवरून नेट बँकिंग वापरत असाल तर ते अॅप वेळोवेळी अपडेट करत राहा. अपडेट केल्याने अॅपमधील नवीन सिक्युरिटी फीचर आपोआप अपडेट होतात. हे तुम्हाला फसवणुकीपासून सुरक्षित ठेवते.

Investment Tips: मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणुकीदरम्यान 'या' चुका टाळा, नुकसान होणार नाही

नेट बँकिंग माहिती फोनमध्ये सेव्ह करु नका

अनेकांना ही सवय असते की ते आपली सर्व माहिती फोनमध्ये सेव्ह करून ठेवतात. अशा परिस्थितीत फोन चोरीला गेल्यास तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत नेट बँकिंग पासवर्ड इत्यादी माहिती फोनवर सेव्ह करू नये हे तुम्ही लक्षात ठेवावे.

पब्लिक नेटवर्कचा वापर टाळा

नेट बँकिंग वापरत असताना हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या फोनचे नेटवर्क वापरता. कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी सार्वजनिक नेटवर्क वापरणे टाळा. कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक झाल्यास, ताबडतोब बँकेला कळवा आणि शक्य तितक्या लवकर तुमचे खाते बंद करा.

First published:

Tags: Money, Online meetings, बँक