मराठी बातम्या /बातम्या /मनी /याठिकाणी करा FD मध्ये सुरक्षित गुंतवणूक, जाणून घ्या 6.95% पर्यंत व्याजदर देणार्‍या बँका

याठिकाणी करा FD मध्ये सुरक्षित गुंतवणूक, जाणून घ्या 6.95% पर्यंत व्याजदर देणार्‍या बँका

गुंतवणूकदारांसाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा पर्याय लोकप्रिय आहे. यामध्ये निश्चित रिटर्न मिळणार असतो, त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल FD कडे असतो.

गुंतवणूकदारांसाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा पर्याय लोकप्रिय आहे. यामध्ये निश्चित रिटर्न मिळणार असतो, त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल FD कडे असतो.

गुंतवणूकदारांसाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा पर्याय लोकप्रिय आहे. यामध्ये निश्चित रिटर्न मिळणार असतो, त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल FD कडे असतो.

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : गुंतवणूकदारांसाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा पर्याय लोकप्रिय आहे. यामध्ये निश्चित रिटर्न मिळणार असतो, त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल FD कडे असतो. काही गुंतवणूकदार कर वाचवणारे एफडी खाते उघडणे पसंत करतात. ज्यामुळे त्यांना इनकम टॅक्स कायदा कलम 80C अंतर्गत कर द्यावा लागत नाही. 1.5 लाख पर्यंतच्या गुंतवणुकीवर करसवलतीसाठी क्लेम करता येतो. करबचत करणाऱ्या एफडीचा लॉक इन पिरियड 5 वर्षाचा असतो आणि त्या मॅच्युरिटीआधी विड्रॉ करता येत नाही.

या अनिश्चित कोविड-19 च्या काळात , गुंतवणूकदार त्यांचे भांडवल टिकवण्यासाठी बँक एफडी सारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत.  दरम्यान जाणून घेऊया टॅक्स सेव्हिंग एफडी कोणत्या आहेत. खाली दिलेल्या चार्टमध्ये 5 वर्षांच्या टेन्योरसाठी असणाऱ्या एफडीसंबंधीत डेटा देण्यात आला आहे (ज्येष्ठ नागरिक वगळता). या एफडीसाठी त्रैमासिक कंपाउंडिंग आहे.

(हे वाचा-ही बँक देतेय स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी, वाचा तुमचा कसा होईल फायदा)

लहान खाजगी बँकांमध्ये एफडीवर मिळते अधिक व्याज

करबचत करणाऱ्या एफडीवर छोट्या खाजगी बँका 6.9 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत. BankBazaar च्या आकडेवारीनुसार ही माहिती आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा याठिकाणी असणारे एफडी रेट्स अधिक आहेत.

डीसीबी बँक (DCB) बँक सर्वाधिक व्याज दर देते आहे. या बँकेचा व्याजदर 6.95 टक्के आहे. यानंतर आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank), इंडसइंड बँक, येस बँक आणि आरबीएल बँक या बँका पाच वर्षांच्या कर-बचत एफडीवर 6.5 ते 6.75 टक्के व्याज देणाऱ्या बँका आहेत.

(हे वाचा-PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! 8.5 टक्के व्याजाची रक्कम एकरकमी मिळण्याची शक्यता)

अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यासारख्या खाजगी बँका कर बचत एफडीवर अनुक्रमे 5.50 टक्के, 5.35 टक्के आणि 5.30 टक्के व्याज देतात.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पंजाब अँड सिंध बँक 5.55 टक्के व्याजसह पहिल्या क्रमांकावर असून कर-बचत एफडीवर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा अनुक्रमे 5.40 टक्के आणि 5.30 टक्के व्याज देतात.

First published: