मुंबई : फेस्टिवल ऑफर आणि नव्यावर्षाआधी बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र स्वस्त होम लोन देत आहे. बँकेने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. तुमचं घर घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार कारण बँक ऑफ महाराष्ट्र स्वस्त होमलोन देत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये RBI ने रेपो रेट वाढवले. त्यामुळे होमलोन आणि EMI मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. सध्या लोन घेणं आवाक्याबाहेर होत चाललं आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने आता फेस्टिवल ऑफर्स आणल्या आहेत. सर्वात स्वस्त व्याजदर आणि प्रोसेसिंग फी नाही असंही ट्वीट करून ग्राहकांना सांगितलं आहे. 8.35 टक्क्यांपासून ग्राहकांना होमलोन मिळणार आहे. यासाठी ग्राहक ऑनलाईन किंवा आपल्या जवळच्या शाखेत भेट देऊन ऑफलाईन देखील अर्ज करू शकतात. कोणत्या कारणांसाठी घेता येईल लोन - नवीन घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी किंवा विद्यमान घराचे किंवा फ्लॅटचे अधिग्रहण करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी. - भूखंड खरेदी करून त्यावर घर बांधण्यासाठी. - नवीन कर्जदारांसाठी सध्याच्या घराचे नूतनीकरण करण्यासाठी, किंवा दुरुस्तीसाठी
मुलीचं भविष्य करा सुरक्षित, ‘या’ सरकारी स्कीममध्ये 250 रुपयांपासून करा गुंतवणूकSeize the chance to increase your happiness twice over. #BankofMaharashtra offers #homeloan at the #lowestinterest rate in India along with zero processing fee under #FestiveOffers.
— Bank of Maharashtra (@mahabank) December 24, 2022
Click to know more: https://t.co/ctWPyLqxfO#christmas #christmasoffers #dhamaka #homeloan pic.twitter.com/kQ0NkGGjtS
फायदे कर्जाची रक्कम तुम्हाला जास्त मिळते. याशिवाय कमी हप्ता ठेवण्याची सुविधा आहे. तुम्हाला शून्य प्रोसेसिंग फी घेतली जाते. याशिवाय कोणतेही छुपे शुल्क घेतले जात नाहीत. सर्व कागदपत्र उपलब्ध असतील तर प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली जाते. प्रीपेमेंट केल्यास कोणताही दंड लागत नाही.
Christmas : खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रने या सुविधांवर दिला सर्वात मोठा डिस्काउंटमहिला आणि सैन्यातील कर्मचारी आणि अधिकार्यांसाठी 0.05% सवलत कमाल कार्यकाळ 30 वर्षांपर्यंत / वयाच्या 75 वर्षापर्यंत कोणतेही प्री-पेमेंट / प्री-क्लोजर / पार्ट पेमेंट शुल्क नाही वाहन कर्ज आणि शिक्षण कर्ज घेणार्यांसाठी गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी व्याजदरात सवलत कोणती कागदपत्र लागतात? पूर्णपणे भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज पासपोर्ट आकाराचे दोन फोटो ओळखीचा पुरावा: (कोणताही एक) - निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, वर्तमान नियोक्त्याने जारी केलेले फोटो ओळखपत्र पासपोर्ट रहिवासी पुरावा: (कोणताही एक)- वीज बिल, निवडणूक ओळखपत्र, टेलिफोन बिल (लँडलाइन), आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, वर्तमान नियोक्त्याने जारी केलेले फोटो ओळखपत्र, पासपोर्ट
1 जानेवारीपासून बदलणार लॉकरचे नियम, तुम्ही तर घेतलं नाही ना?पगारदार व्यक्तींसाठी मागील 3 महिन्यांच्या नवीनतम वेतन स्लिपची मूळ/प्रमाणित प्रत मागील 2 वर्षांच्या आयटी रिटर्नच्या प्रती IT विभाग/IT मुल्यांकन आदेश किंवा नियोक्त्याकडून गेल्या 2 वर्षांसाठी फॉर्म 16 द्वारे रीतसर पोचपावती. नियोक्त्याकडून मासिक हप्त्याचे पैसे पाठवण्याचे वचन, जेथे शक्य असेल तेथे. मागील 6 महिन्यांचे बँक खाते (पगारदार खाते) स्टेटमेंट (इतर बँकेच्या बाबतीत)