बँक ऑफ महाराष्ट्रने खास ख्रिसमस निमित्ताने आणि न्यू ईयरआधी ऑफर आणली आहे. आधीच रेपो रेट वाढल्याने ग्राहकांना जास्तीचा EMI भरावा लागत आहे. ही नवीन धमका ऑफर आणली आहे ज्यामुळे ग्राहकांना स्वस्त होम लोन आणि कार लोन मिळू शकेल.
2/ 7
बँक ऑफ महाराष्ट्रने स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या धमाका ऑफरमध्ये होम लोन आणि कार लोन स्वस्त मिळणार असल्याचा दावा बँकेनं केला आहे. याशिवाय ऑनलाईन पेमेंट आणि काही खास शॉपिंगवर डिस्काउंट देखील उपलब्ध असणार आहेत.
3/ 7
मिशोसाठी आता 20 टक्के ऑफ मिळणार आहे. स्मार्ट बजारवर 200 रुपयांचा ऑफ मिळणार आहे. स्विगी आणि झोमॅटोवर देखील 15 टक्के डिस्काउंट देण्यात आला आहे.
4/ 7
महासुपर होम लोन ग्राहकांना 8.35 टक्के व्याजदराने मिळणार आहे. वर्ष आणि रक्कम जशी वाढेल तसे व्याजदर वाढत जाईल मात्र सुरुवात 8.35 टक्क्यांपासून होत आहे. याशिवाय होमलोनसाठी कोणतीही प्रोसेसिंग फी घेतली जाणार नाही.
5/ 7
तुमचं कार घेण्याचं स्वप्नही आता पूर्ण होऊ शकतं. बँक ऑफ महाराष्ट्र आता महासुपर कार लोन देत आहे. 9.5 टक्के व्याजदराने हे लोन देत आहे. यासाठी देखील कोणतीही प्रोसेसिंग फी घेतली जाणार नाही. तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता.
6/ 7
पर्सनल लोन ग्राहकांना 9.25 टक्के व्याजदराने मिळणार आहे. खासगी बँकांमध्ये हेच व्याजदर 12 टक्क्यांपासून सुरू होतं. तर बँक ऑफ महाराष्ट्र सर्वात कमी व्याजदराने लोन देत आहे.
7/ 7
तुम्हाला गोल्ड लोन हवं असेल तरी बँक ऑफ महाराष्ट्र ते देत आहे. 9.5 टक्के व्याजदर त्यावर असेल. सर्वात कमी व्याजदर असल्याचा दावा बँक ऑफ महाराष्ट्रने केला आहे.