मुंबई : तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक आहात का? तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र चं लोन घेतलंय का? मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांना पुन्हा एकदा दणका दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या MCLR रेटमध्ये 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने MCLR रेटमध्ये वाढ केल्यामुळे होम लोन EMI, कार लोन आणि पर्सनल लोनच्या व्याजदरात आणि EMI मध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांवर अधिक भार पडण्याची शक्यता आहे.
करंट आणि सेविंग अकाउंटमध्ये काय फरक, किती उघडता येतात आणि काय फायदे?जगतिक बाजारपेठेतील आर्थिक स्थिती सध्या चांगली नाही. US फेड रिझर्व्ह बँकेनं महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात वाढ केली आहे. इकडे RBI ने मात्र सलग सहा वेळा रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर थोडा ब्रेक घेतला आहे.
मुलीचं भविष्य करा सुरक्षित, ‘या’ सरकारी स्कीममध्ये 250 रुपयांपासून करा गुंतवणूकरेपो रेटमध्ये तूर्तास कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र पुढे वाढेल की नाही याबाबत कोणतेही संकेत देखील RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले नाहीत. CNBC आवाजने दिलेल्या माहितीनुसार सहा महिन्यांच्या MCLR मध्ये 10 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. तर एक वर्षाच्या MCLR रेटमध्ये 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. सहा महिन्यांसाठी MCLR रेट हा 8.50 टक्के होता तो आता 8.40 टक्के करण्यात आला आहे. तर एक वर्षाचा MCLR रेट हा 8.40 टक्के होता तो आता 8.50 टक्के करण्यात आला आहे.
MCLR हा बँकांसाठी कॉर्पोरेट कर्जाच्या किंमतीसाठी अंतर्गत बेंचमार्क आहे. बँकिंग प्रणालीसाठी डिसेंबर-अखेर 2022 पर्यंत एकूण कर्जांमध्ये MCLR-संबंधित कर्जाचा वाटा 46.1 टक्के होता. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, बँकिंग प्रणालीसाठी डिसेंबर-अखेर 2022 पर्यंत एकूण कर्जांमध्ये बाह्य बेंचमार्क लिंक्ड (किरकोळ आणि MSME) कर्जाचा वाटा 48.3 टक्के होता.