मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आता लोन होणार स्वस्त, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'या' बँकेचा मोठा निर्णय

आता लोन होणार स्वस्त, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'या' बँकेचा मोठा निर्णय

आता लोन होणार स्वस्त, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'या' बँकेचा मोठा निर्णय

आता लोन होणार स्वस्त, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'या' बँकेचा मोठा निर्णय

बँक ऑफ महाराष्ट्रनं वैयक्तिक कर्जावरील व्याजदर सध्याच्या 11.35 टक्क्यांवरून ते 8.9 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर आजपासून म्हणजेच 17 ऑक्टोबर 2022 लागू झाले आहेत. बँकेनं यापूर्वीच 'दिवाळी धमाका' ऑफर अंतर्गत गृह कर्ज आणि कार कर्जासाठी प्रक्रिया शुल्क माफ केलं आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 17 ऑक्टोबर: प्रसिद्ध सरकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्रानं (BOM) रविवारी सणासुदीच्या सवलतीचा भाग म्हणून गृहकर्जावरील व्याजदर आठ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. ही बँक सध्या 8.3 टक्के दरानं गृहकर्ज देते. गृहकर्जाचे दर कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतात. ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितके बँकांकडून कर्ज देणं सोपं जातं. शिवाय कर्जाच्या दरातही सूट दिली जाते. अलीकडेच SBIने सणासुदीच्या काळात गृहकर्जाच्या दरात सूट जाहीर केली होती. SBI कर्ज देखील क्रेडिट स्कोअरवर आधारित आहे.

दुसरीकडे बँक ऑफ महाराष्ट्रनेही वैयक्तिक कर्जावरील व्याजदर सध्याच्या 11.35 टक्क्यांवरून 8.9 टक्के कमी करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर सोमवारपासून (17 ऑक्टोबर 2022) लागू झाले आहेत. बँकेनं यापूर्वीच 'दिवाळी धमाका' ऑफर अंतर्गत गृह कर्ज आणि कार कर्जासाठी प्रक्रिया शुल्क माफ केले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफर-

किरकोळ कर्जे, विशेषत: गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जासाठी बँकेनं बँकिंग उद्योगातील सर्वात कमी व्याजदरांपैकी एक देखील देऊ केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका निवेदनात म्हटलं आहे, वाढत्या धोरणात्मक दरांच्या पार्श्वभूमीवर व्याजदर वाढत आहेत. अशा वेळी, BoM ग्राहकांमध्ये आनंद आणण्यासाठी सणासुदीच्या काळात किरकोळ कर्ज स्वस्त करत आहे.

हेही वाचा: LICची लय भारी’ स्कीम’! गुंतवणूक केल्यास दरमहा मिळेल 12 हजार रुपये पेन्शन

यापूर्वी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानंही सणासुदीच्या काळात ग्राहकांना स्वस्त कर्जाचा लाभ देण्याची घोषणा केली होती. घोषणेनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया होम लोनवर 15 बेस पॉइंट्स ते 30 बेस पॉइंट्सची सूट देत आहे. स्टेट बँकेची ही नवीन ऑफर 4 ऑक्टोबरपासून लागू होणार असून ती 31 जानेवारी 2023 पर्यंत चालणार आहे. स्टेट बँकेचा सामान्य गृहकर्ज दर 8.55 टक्क्यांपासून सुरू होतो आणि 9.05 टक्क्यांपर्यंत जातो. पण सणासुदीच्या ऑफरअंतर्गत हा दर 8.40 टक्क्यांवरून 9.05 टक्के करण्यात आला आहे.

SBI देखील देत आहे डिस्काउंट ऑफर

स्टेट बँकेच्या स्टेटमेंटनुसार नवीन गृहकर्ज ऑफरमध्ये नियमित आणि टॉप अप कर्जांवर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारलं जाणार नाही. तथापि ग्राहकांनी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की स्वस्त गृहकर्ज आणि कमी EMI चा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे चांगला CIBIL स्कोर असावा. जर CIBIL स्कोर चांगला नसेल तर स्वस्त गृहकर्जाचा लाभ मिळणार नाही.

वाढती महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करत आहे. डिसेंबरमध्ये रेपो दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. या दरात वाढ झाल्यानं कर्ज महाग होतं. याचा सर्वाधिक परिणाम गृहकर्जावर होत आहे. रेपो रेट वाढल्यानं अनेक वेळा गृहकर्जाचे दर वाढले आहेत. त्यानुसार सर्व बँकांनी कर्जदरात वाढ केली आहे. दरम्यान काही बँका अशा आहेत ज्या सणासुदीच्या काळात ग्राहकांना स्वस्तात कर्ज देत आहेत.

First published:

Tags: Bank details, Rate of interest