जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमच्या खिशातील ही 500ची नोट खरी आहे की खोटी? ओळखण्यासाठी वापरा ही सोपी ट्रिक

तुमच्या खिशातील ही 500ची नोट खरी आहे की खोटी? ओळखण्यासाठी वापरा ही सोपी ट्रिक

तुमच्या खिशातील ही 500ची नोट खरी आहे की खोटी? ओळखण्यासाठी वापरा ही सोपी ट्रिक

तुमच्या खिशातील ही 500ची नोट खरी आहे की खोटी? ओळखण्यासाठी वापरा ही सोपी ट्रिक

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये 500 रुपयांच्या दोन नोटांमधील फरक स्पष्ट करून खऱ्या आणि बनावटीची ओळख सांगितली जात आहे. या व्हिडिओमध्ये नोटमध्ये दिलेल्या हिरव्या पट्टीच्या जागेबाबत अलर्ट करण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 नोव्हेंबर: नोटाबंदीनंतर लोक नवीन आणि जुन्या नोटांबाबत खूप सावध आहेत. मात्र दक्षतेनंतरही बनावट नोटांच्या विळख्यातून सुटता येत नाही. विशेषत: 500 रुपयांच्या नव्या नोटेबाबत सतत बातम्या येत असतात. 500 रुपयांच्या नोटेवर हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ नसून गांधीजींच्या फोटोजवळ असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 500 रुपयांच्या दोन नोटांमधील फरक स्पष्ट करून खऱ्या आणि बनावट नोटेची ओळख कशी करायची याची माहिती सांगितली जात आहे. या व्हिडिओमध्ये नोटमध्ये दिलेल्या हिरव्या पट्टीची जागा नेमकी कुठली याबाबत अलर्ट करण्यात आलं आहे. पीआयबीने हा संदेश बनावट असल्याचे सांगितले- गेल्या वर्षीच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात पीआयबी या भारत सरकारच्या प्रेस एजन्सीने या व्हायरल मेसेजची सत्यता सांगितली होती. पीआयबीने त्यांच्या तथ्य तपासणीत हे दावे खोटे असल्याचं म्हटलं होतं. पीआयबीने त्यांच्या फॅक्ट चेक अकाऊंटवरून ट्विट केलं होतं आणि म्हटलं होतं की, ‘व्हिडिओमध्ये अशी चेतावणी दिली जात आहे की, ज्यामध्ये हिरवा पट्टा RBI गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ नसून गांधीजींच्या फोटोजवळ आहे, अशी 500 ची अशी कोणती नोट घेऊ नये.” परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 500 रुपयांच्या दोन्ही प्रकारच्या नोटा वैध आहेत.  हेही वाचा: Investment Tips: मंदीत संधी! ‘या’ तीन प्रकारे करा गुंतवणूक, होणार नाही आर्थिक नुकसान एका व्हिडिओमध्ये अशी चेतावणी दिली जात आहे की 500 रुपयांची अशी कोणतीही नोट घेऊ नये, ज्यामध्ये हिरवी पट्टी RBI गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ नसून गांधीजींच्या फोटोजवळ असेल.

जाहिरात

सरकारशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या बातम्यांबाबत येथे तक्रार करा- सरकारशी संबंधित कोणतीही दिशाभूल करणारी बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत देखील घेऊ शकता. PIB FactCheck या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 918799711259 वर किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करून कोणीही दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL पाठवू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: rupee
  • First Published :
जाहिरात
जाहिरात