जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ‘या’ दोन बँकांचा ग्राहकांना दणका! कर्ज झालं महाग, चेक करा नवे व्याजदर

‘या’ दोन बँकांचा ग्राहकांना दणका! कर्ज झालं महाग, चेक करा नवे व्याजदर

‘या’ दोन बँकांचा ग्राहकांना दणका! कर्ज झालं महाग, चेक करा नवे व्याजदर

‘या’ दोन बँकांचा ग्राहकांना दणका! कर्ज झालं महाग, चेक करा नवे व्याजदर

Home Loan EMI: देशातील दोन मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मोठा धक्का दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 नोव्हेंबर**:** तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजेच IOB कडून कर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण, देशातील या दोन मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मोठा धक्का दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. दोन्ही बँकांनी व्याजदर वाढवले ​​आहेत. नवे दर 7 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. याआधी एसबीआयसह अनेक मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांनीही कर्जाचे दर वाढवले ​​आहेत. कोणत्या बँकेनं किती वाढवले दर-

  • बँक ऑफ महाराष्ट्रने MCLR मध्ये 0.10 टक्क्यांपर्यंत वाढ जाहीर केली आहे.
  • इंडियन ओव्हरसीज बँकेनंही कर्जाचे दर वाढवण्याची घोषणा केली आहे. बँकेनं MCLR म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये 0.15 टक्के वाढ केली आहे.
  • अॅक्सिस बँकेपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, फेडरल बँक यांनीही व्याजदर वाढवले ​​आहेत. HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, एका रात्रीच्या कालावधी असलेल्या कर्जावरील ACLR 7.90 टक्क्यांवरून 8.20 टक्के करण्यात आला आहे.

हेही वाचा:  NEFT आणि IMPS मध्ये फरक काय? कोणता पर्याय सर्वांत चांगला

  • एक महिन्याच्या मुदतीच्या कर्जावरील MCLR 8.25 टक्के आणि 3 ते 6 महिन्यांच्या कर्जावरील व्याजदर 8.30 वरून 8.40 टक्के करण्यात आला आहे.
  • RBI ने 2016 मध्ये मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट सुरू केला होता. एकदा MCLR निश्चित झाल्यानंतर, कोणतीही बँक यापेक्षा कमी दराने ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाही.

या बँकांनीही वाढवले व्याजदर: अलीकडेच HDFC बँकेनं आपल्या व्याजदरात वाढ केली होती. HDFC बँकेपाठोपाठ आणखी एका बँकेनं व्याजदर वाढवलं आहे. त्यामुळे EMI आणि व्याजदर वाढल्याने ग्राहकांवर अधिकचा खर्चाचा बोझा पडणार आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या कॅनरा बँकेने कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे.बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये 15 ते 20 बेसिस पॉइंटने वाढ केली. याशिवाय रेपो रेट लिंक्ड लेंडिंग रेटमध्येही वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर 7 नोव्हेंबर 2022 पासून म्हणजेच सोमवारपासून लागू झाले आहेत. या बँकांनंतर बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इंडियन ओव्हरसीज बँकेनं व्याजदर वाढवल्यांमुळं ग्राहकांना फटका बसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात