जाहिरात
मराठी बातम्या / मनी / बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना झटका; व्याजदरातील बदलामुळे परतावा कमी होणार

बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना झटका; व्याजदरातील बदलामुळे परतावा कमी होणार

बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना झटका; व्याजदरातील बदलामुळे परतावा कमी होणार

बँकेने बचत खात्यातील 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. तर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. बँकेचे नवीन दर 1 मे 2022 पासून लागू झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 मे : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाच्या (Bank Of India) ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. बँकेने आपल्या बचत खाते (Saving Account) आणि मुदत ठेवींवरील (Fixed Deposit) व्याजदरात कपात केली आहे. BOI ने बचत खात्यावरील व्याजदरात 0.15 टक्के कपात केली आहे. बँकेने बचत खात्यातील 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. तर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. बँकेचे नवीन दर 1 मे 2022 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या वेबसाइटनुसार, जर एखाद्या बचत खातेधारकाच्या बँक खात्यात 1 लाख रुपयांपर्यंत शिल्लक असेल तर त्याला आता केवळ 2.75 टक्के वार्षिक व्याज मिळेल. त्याच वेळी, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त शिल्लक असल्यास 2.90 टक्के वार्षिक व्याज दिले जाईल. 1 लाख रुपयांपर्यंत शिल्लक असल्यास व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. 1 लाखापेक्षा जास्त शिल्लक असलेल्या व्याजदरात कोणतीही कपात नाही. LIC IPO GMP: एलआयसी IPO च्या ग्रे मार्केट प्राईजमध्ये झपाट्याने वाढ, गुंतवणूक करावी की नाही? तज्ज्ञ काय सांगतात? बँक ऑफ इंडियाचे नवीन एफडी दर बँक ऑफ इंडिया आता 7 ते 45 दिवसांच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर 2.85 टक्के व्याजदर देईल. बँक 46 दिवस ते 90 दिवस आणि 91 दिवस ते 179 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 3.85 टक्के व्याज देईल. 180 दिवसांपासून ते 269 दिवस आणि 270 दिवसांपर्यंत एका वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर आता बँक ऑफ इंडियाकडून 4.35 टक्के व्याज मिळेल. लोन, बँक चार्जेस, गुंतवणूक संबंधित चार नियमांत बदल; नव्या नियमांचा तुमच्यावर कसा परिणाम होणार समजून घ्या 1 वर्ष आणि त्याहून अधिक मुदतीच्या परंतु 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या रुपयाच्या FD वरील व्याज दर 5.00 टक्के असेल, तर 2 वर्षे आणि त्याहून अधिक परंतु 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी व्याज दर 5.20 टक्के असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात