मुंबई, 3 डिसेंबर: गेल्या काही दिवसात विविध बँकांच्या कर्जदरात वाढ झाली आहे. आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियानं पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांना धक्का दिला आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली होती. त्याच वेळी या बँकांनी पुन्हा एकदा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड लेंडिंग बेस्ड रेटमध्ये (MCLR) वाढ केली आहे, म्हणजेच त्याच्याशी संलग्न कर्जाचा व्याजदर वाढेल. ही दरवाढ 1 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहे.त्यामुळं ग्राहकांना फटका बसणार आहे.
ICICI बँकेनं सर्व कालावधीसाठी MCLR मध्ये 10 बेस पॉइंट्सनं वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बँकेनं कर्जाच्या व्याजात 5 बेसिस पॉइंट्सनं आणि बँक ऑफ इंडियानं सर्व कालावधीसाठी 25 बेसिस पॉइंट्सनं वाढ केली आहे.
ICICI बँक कर्ज दरात वाढ-
MCLR मध्ये 10 बेसिस पॉइंट्सनं वाढ केल्यानंतर, ICICI बँकेकडून एका महिन्याचा MCLR दर 8.05 टक्क्यांवरून 8.15 टक्के करण्यात आला आहे. ICICI बँकेत तीन महिने, सहा महिन्यांचा MCLR अनुक्रमे 8.20 टक्के आणि 8.35 टक्के करण्यात आला आहे. एक वर्षाचा MCLR 8.40 टक्के करण्यात आला आहे.
हेही वाचा: SBIच्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवा पैसे, व्याजाच्या पैशात भागतील सर्व गरजा
पंजाब नॅशनल बँकेच्या कर्जावरील व्याज दरात एवढी केली वाढ-
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी MCLR 5 बेस पॉईंटनं वाढवला आहे. एका वर्षासाठी कर्ज घेतल्यावर आता तुम्हाला 8.10 टक्के व्याज द्यावं लागेल, जे पूर्वी 8.05 टक्के होते. त्याचप्रमाणे सहा महिन्यांचं व्याज 7.80 टक्क्यांवरून 7.75 टक्के करण्यात आलं आहे. तीन वर्षांसाठीचं व्याज 8.35 टक्क्यांवरून 8.40 टक्के करण्यात आलं आहे.
बँक ऑफ इंडियानं कर्जाच्या व्याजदरात केली वाढ-
बँकेनं कमाल 25 पॉइंटनी व्याजात वाढ केली आहे, जी सर्व कालावधीसाठी लागू असेल. याचा अर्थ बँक ऑफ इंडिया आता 1 वर्षासाठी 8.15 शुल्क आकारेल, जे पूर्वी 7.95 टक्के होतं. सहा महिन्यांचं व्याज 7.90 टक्के असेल, पूर्वी ते 7.65 टक्के होते. याशिवाय तीन वर्षांसाठी कर्जावरील व्याज 8.10 टक्के असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instant loans, Loan