जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Free Silai Machine Scheme: सरकार मोफत देत आहे शिलाई मशीन, आजच करा अर्ज

Free Silai Machine Scheme: सरकार मोफत देत आहे शिलाई मशीन, आजच करा अर्ज

Free Silai Machine Scheme: सरकार मोफत देत आहे शिलाई मशीन, आजच अर्ज करा

Free Silai Machine Scheme: सरकार मोफत देत आहे शिलाई मशीन, आजच अर्ज करा

Free Silai Machine Scheme: या योजनेसाठी पात्र महिला अर्ज करून शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकतात.  देशातील सर्व राज्यांसाठी केंद्र सरकारचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै: देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक म्हणजे मोफत शिलाई मशीन (Free Silai Machine Yojana 2022). या योजनेअंतर्गत सरकार महिलांना मोफत शिलाई मशीन (Free Silai Machine) देते. या योजनेच्या मदतीने महिलांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही, याची काळजी घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. स्त्रिया त्यांच्या प्रत्येक गरजा स्वतःहून पूर्ण करण्यासाठी सक्षम असायला हव्यात. याच उद्देशाच्या पूर्ततेसाठी शासनाकडून महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे. शिलाई मशिनसाठी कोणतंही शुल्क नाही- या योजनेसाठी पात्र असलेल्या महिला अर्ज करून शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकतात (Apply For Free Silai Machine Yojana 2022). देशातील सर्व राज्यांसाठी केंद्र सरकारचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रत्येक राज्यातील 50 हजार महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जात असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जात नाही. 20 ते 40 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि शिलाई मशीन मोफत मिळवू शकतात आणि स्वतःचा रोजगार सुरू करू शकतात. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना सुरू आहे. या राज्यांतील महिला या योजनेचा लाभ घेऊन आपला रोजगार सुरू करू शकतात. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा- ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलाही यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. जर एखाद्या महिलेला या योजनेंतर्गत अर्ज करायचा असेल, तर प्रथम www.india.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होमपेजवर, तुम्हाला मोफत शिलाई मशिनसाठी अर्ज करण्याची लिंक मिळेल. हेही वाचा-  सोपंय! Whatsapp कॉल कसा रेकॉर्ड करायचा? ‘या’ ट्रिकचा करा वापर अधिकारी करतात तपास- लिंकवर क्लिक करा आणि अर्जाच्या PDF ची प्रिंट काढा. त्यानंतर अर्ज भरा आणि फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडा. त्यानंतर संबंधित कार्यालयात फॉर्म जमा करा. अधिकारी तुमच्या अर्जाची छाननी करतील. अर्जात दिलेली माहिती बरोबर आढळल्यास, तुम्हाला शिलाई मशीन मोफत दिले जाईल. मोफत शिलाई मशीन मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जन्मतारीख प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

या योजनेसाठी पात्रता:

  • अर्जदार भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे
  • देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
  • महिला अर्जदाराच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • विधवा आणि दिव्यांग महिला देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात आणि लाभ घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: scheme
  • First Published :
जाहिरात
जाहिरात