नवी दिल्ली, 04 मार्च: जर तुम्ही स्वस्तात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda special offer) तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला अगदी स्वस्तात घर (Residential Property) खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. बँक ऑफ बडोदा काही मालमत्तांचा लिलाव करणार आहे. हा लिलाव 4 मार्च रोजी होत आहे. लिलावामध्ये डीफॉल्ट यादीत नाव असलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्ता विकून बँक आपले पैसे परत मिळवणार आहे. त्यामुळे तुम्ही जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी असू शकते. जाणून घ्या या लिलाव प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती. लिलाव कधी होणार? बँक ऑफ बडोदाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने ट्विटमध्ये लिहिले आहे, की मेगा ई-लिलाव (Bank of Baroda Mega E-auction) 4 मार्च 2022 रोजी केला जाईल. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा (residential and commercial property) ई-लिलाव केला जाणार आहे. तुम्ही येथे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करू शकता. हे वाचा- रशिया-युक्रेन युद्धाचा तुमच्या खिशावर परिणाम; गगनाला भिडणार घरगुती गॅसच्या किमती नोंदणी कुठे करायची? बँक ऑफ बडोदा मेगा ई-लिलावात भाग घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या बोलीदारांना e Bkray पोर्टल https://ibapi.in/ वर नोंदणी करावी लागेल. या पोर्टलवर ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करावी लागेल.
Sapno se aage badho and move into your dream property in just a few clicks. 4th March ko hone wale #BankofBaroda Mega e-Auction ke saath.
— Bank of Baroda (@bankofbaroda) March 1, 2022
Know more https://t.co/Jeq8bKupcH#AzadiKaAmritMahotsav @AmritMahotsav pic.twitter.com/hmI4KI4kkV
केवायसी डॉक्युमेंट असणं आवश्यक या लिलावात भाग घेण्यास इच्छुक असलेल्यांना KYC डॉक्युमेंट अपलोड करणं आवश्यक असेल. केवायसी कागदपत्रांची ई-लिलाव सर्व्हिस प्रोव्हायडरतर्फे पडताळणी केली जाईल. या सर्व प्रक्रियेस 2 दिवस लागू शकतात. अधिक माहितीसाठी लिंक मालमत्तेच्या लिलावाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तुम्ही https://ibapi.in/https://www.bankofbaroda.in/e auction.htm?utm_source=SM&utm_medium=Post&utm_campaign=MegaAuction_km या लिंकला भेट देऊ शकता. हे वाचा- आता पतंजलीचं क्रेडिट कार्डही लाँच, ग्राहकांना मिळणार या सुविधा बँका वेळोवेळी करतात लिलाव ज्या मालमत्तेचे मालक त्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाहीत, अशा लोकांच्या जमिनी किंवा मालमत्ता बँका ताब्यात घेतात. त्यानंतर अशा मालमत्तांचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते. त्यामुळे बँकेला तिचे पैसे मिळतात आणि घर विकत घेणाऱ्याला स्वस्त किमतीत कागदपत्रं क्लिअर असलेलं घर मिळण्याची संधी उपलब्ध होते. बँकेनी जमिनी किंवा घराची कागदपत्र तपासलेली असतात त्यामुळे तो धोका उरत नाही.