जाहिरात
मराठी बातम्या / मनी / जानेवारीआधी पूर्ण करा बँकेचं काम, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

जानेवारीआधी पूर्ण करा बँकेचं काम, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

जानेवारीआधी पूर्ण करा बँकेचं काम, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

नव्या नियमानुसार ग्राहकाने करारावर स्वाक्षरी केली की नाही हे देखील पाहाणं आवश्यक असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: वर्ष संपण्यासाठी फक्त 15 दिवस शिल्लक आहेत. नव्या वर्षात बँकेतील लॉकरचा नियम देखील बदलणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बँकेत लॉकर घेतलं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. नवीन वर्ष सुरू होण्याआधी तुम्हाला बँकेकडून लॉकर अॅग्रीमेंट करून घ्यावं लागेल. नाहीतर तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. नव्या नियमानुसार ग्राहकाने करारावर स्वाक्षरी केली की नाही हे देखील पाहाणं आवश्यक असणार आहे. पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना यासंदर्भातील माहिती दिली आहे. पीएनबीने दिलेल्या निवेदनानुसार, 31 डिसेंबर 2022 पूर्वी लॉकर वापरणाऱ्या ग्राहकांना बँक नवीन लॉकर करार करणं आवश्यक आहे. हा करार जर केला नसेल तर तो आवश्य करून घ्या नाहीतर अडचणींचा सामना करावा लागेल.

रोज 71 रुपये गुंतवा आणि 50 लाखांपर्यंत द्या स्वत:लाच गिफ्ट

यासोबत बँकेनं लॉकरचे चार्जेस देखील बदलले आहेत. लॉकरच्या आकारनुसार 500 ते 3000 रुपये असे दर ठरवण्यात आले होते. आता मेट्रोपॉलिटन शहरातील बँकांनी लहान, मध्यम आणि मोठा लॉकर अशी वर्गवारी केली आहे. 2,000, 4000, 8000 आणि 12 हजार असे चार्ज केले आहे. तर अर्ध शहरी आणि ग्रामीण भागात 1,500, 3,000, 6,000 आणि 9,000 असे दर ठरवण्यात आले आहेत.

SBI ग्राहकांना दणका! आजपासून या गोष्टीसाठी मोजावे लागणार जास्त पैसे
News18लोकमत
News18लोकमत

पीएनबी लॉकर अॅग्रीमेंट पॉलिसीनुसार ग्राहकाला लॉकर वाटप करताना बँक त्या ग्राहकाशी करार करते. या करारान्वये लॉकर सुविधा दिली जाते. विधिवत सीलबंद कागदावर दोन्ही पक्षांनी केलेल्या लॉकर कराराची प्रत लॉकर भाडेकरूला त्याचे हक्क आणि जबाबदाऱ्या जाणून घेण्यासाठी दिली जाते. तर, कराराची मूळ प्रत ही बँकेच्या शाखेकडे राहते, जिथे ग्राहकाला लॉकरची सुविधा दिली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात