मुंबई, 21 एप्रिल : ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून रिझर्व्ह बँकेने बँक (Reserve Bank Of India) लॉकरच्या नियमांमध्ये (Bank Locker Rules) मोठा बदल केला आहे. जर तुम्ही देखील कोणत्याही बँकेत लॉकर उघडण्याचा विचार करत असाल किंवा तुमचे आधीच कोणत्याही बँकेत लॉकर असेल, तर तुमच्यासाठी नवीन नियमांची माहिती घेणे खूप महत्त्वाचे आहे. बँक लॉकर ग्राहकांच्या सततच्या तक्रारींनंतर रिझर्व्ह बँकेने नियम बदलण्याचा निर्णय घेतला. नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू झाले आहेत. जर तुम्हाला अद्याप या नियमांची माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला यात काय बदल करण्यात आले आहेत त्याची माहिती देतो. चोरी झाल्यास बँक भरपाई देईल बहुतांश ग्राहकांच्या लॉकरमधून वस्तू चोरीला गेल्याची तक्रार आहे. हे थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आता कडक नियम केले आहेत. त्यामुळे बँकांची जबाबदारी वाढली आहे. आता तुमच्या लॉकरमधून काही चोरीला गेल्यास किंवा कोणत्याही प्रकारची गडबड झाल्यास बँकेकडून ग्राहकाला लॉकरच्या भाड्याच्या 100 पट भरपाई द्यावी लागेल. आता बँका चोरीला जबाबदार नाहीत असे म्हणू शकत नाही. सीसीटीव्ही आवश्यक लॉकर रूमवर लक्ष ठेवण्यासाठी आता बँकांना सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक असेल. यासोबतच सीसीटीव्हीचा डेटा 180 दिवस ठेवणेही आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे काही विसंगती आहे का हे तपासण्यास मदत होईल. पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत ग्राहकाने बँकेत कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा चोरीची तक्रार केल्यास सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्ड ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे. बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? 10 टक्क्यांहून कमी व्याजदराने कोणत्या बँका कर्ज देतात, चेक करा ई-मेल आणि एसएमएस अलर्ट पाठवणे आवश्यक ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने आता हे आवश्यक केले आहे की प्रत्येक वेळी ग्राहक त्याच्या लॉकरमध्ये प्रवेश करेल तेव्हा बँकेला एसएमएस आणि ई-मेल पाठवावे लागतील. हा अलर्ट ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवेल. HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; तुमची होणार चांदी, झाला ‘हा’ मोठा बदल रिकाम्या लॉकरची माहिती सार्वजनिक करावी रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनुसार, बँका यापुढे लॉकरची अर्धी पूर्ण किंवा खोटी माहिती ग्राहकांना देऊ शकत नाहीत. त्यांना रिकाम्या लॉकरची यादी, लॉकरची प्रतीक्षा यादी आणि प्रतीक्षा यादीचा क्रमांक सार्वजनिक करावा लागेल. ते बँकेच्या डिस्प्ले बोर्डवर लावावे लागेल. तसेच, त्यांना लॉकर उघडण्याशी संबंधित सर्व अर्ज स्वीकारावे लागतील आणि ग्राहकांना प्रतीक्षा यादीबद्दल माहिती द्यावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.