मराठी बातम्या /बातम्या /मनी /

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; तुमची होणार चांदी, झाला 'हा' मोठा बदल

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; तुमची होणार चांदी, झाला 'हा' मोठा बदल

HDFC बँकेने आपल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी एक नवी योजना आणली आहे.

HDFC बँकेने आपल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी एक नवी योजना आणली आहे.

HDFC बँकेने आपल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी एक नवी योजना आणली आहे.

मुंबई, 20 एप्रिल : आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका नेहमीच नवनवीन योजना घेऊन येत असतात. या योजना ग्राहकांच्या फायद्याच्या असतात. त्याचबरोबर ग्राहकांनी या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे बँकांचाही व्यवसाय वाढतो. HDFC या खासगी बँकेने अशीच एक योजना आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. बँकेने मुदत ठेवीच्या म्हणजेच्या एफडीच्या दरांमध्ये (FD Rates) वाढ केली आहे. हे नवे दर 20 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. HDFC बँकेचे हे नवीन व्याजदर (HDFC Bank latest FD interest rates) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या FD वर लागू होतील. याबद्दलचं सविस्तर वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे. बँकेकडून सर्वसामान्य नागरिकांना 7 ते 29 दिवसांच्या एफडीवर 2.50 टक्के व्याज दिलं जात आहे. याशिवाय बँक 30 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज देत आहेत. नवीन बदलानुसार, HDFC बँक 91 दिवस ते 6 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 3.50 टक्के व्याज देत आहे. बँकेच्या वेबसाईटवर याविषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, एक वर्ष एका दिवसापासून ते दोन वर्षांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 5.10 टक्के दराने व्याज दिलं जाईल. दोन वर्षं एक दिवस ते तीन वर्षं कालावधीच्या FD वर 5.20 टक्के दराने व्याज दिलं जाईल. तसंच तीन वर्षं एक दिवस ते पाच वर्षांपर्यंतच्या FD वर 5.45 टक्के व्याजदर दिला जाईल. पाच वर्षं एक दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 5.60 टक्के व्याजदर मिळेल. (मुलं होत नाहीत, 'त्याला' आजोबांवर संशय, 17 वेळा वार करत संपवलं वृद्धाला) 20 एप्रिलपासून लागू झालेले FD वरील व्याजदर खालीलप्रमाणे आहेत : - 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर 2.50 टक्के व्याज मिळेल. - 15 ते 29 दिवसांच्या एफडीवर 2.50 टक्के व्याज मिळेल. - 30 ते 45 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज मिळेल. - 61 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज मिळेल. - 91 दिवस ते 6 महिन्यांच्या एफडीवर 3.5 टक्के व्याज मिळेल. - 6 महिने 1 दिवस ते 9 महिन्यांच्या एफडीवर 4.4 टक्के व्याज मिळेल. - 9 महिने 1 दिवस ते एका वर्षापर्यंतच्या एफडीवर 4.40 टक्के व्याज मिळेल. - 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.10 टक्के व्याज मिळेल. - 2 वर्षं 1 दिवस ते 3 वर्षापर्यंतच्या एफडीवर 5.20 टक्के व्याज मिळेल. - 3 वर्षं 1 दिवस ते 5 वर्षांच्या एफडीवर 5.45 टक्के व्याज मिळेल. - 5 वर्षं 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.60 टक्के व्याज मिळेल.
First published:

Tags: Hdfc bank

पुढील बातम्या