मराठी बातम्या /बातम्या /मनी /

डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक राहणार बंद, इथे पाहा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट

डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक राहणार बंद, इथे पाहा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट

सतत बँकेत जावं लागत नाही, पण अजूनही अशी काही कामं आहेत जी बँकेतच जाऊन पूर्ण होतात.

सतत बँकेत जावं लागत नाही, पण अजूनही अशी काही कामं आहेत जी बँकेतच जाऊन पूर्ण होतात.

सतत बँकेत जावं लागत नाही, पण अजूनही अशी काही कामं आहेत जी बँकेतच जाऊन पूर्ण होतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : नोव्हेंबर महिना पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांना तातडीने लाईफ सर्टिफिकेट अजूनही जमा केलं नसेल तर करून घ्यायला हवं. तर सध्या ऑनलाईन बँकिंगमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. सतत बँकेत जावं लागत नाही, पण अजूनही अशी काही कामं आहेत जी बँकेतच जाऊन पूर्ण होतात.

जर तुमची अशी काही कामं असतील किंवा काही कामं रखडली असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही कामाचं नियोजन करा. डिसेंबर महिन्यात 14 दिवस बँक बंद असणार आहे. त्यामुळे तुमची कामं पुन्हा रखण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच सुट्ट्यांची लिस्ट चेक आणि तुमच्या कामाचं नियोजन करा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक महिन्यांच्या सुट्ट्यांचं कॅलेंडर जाहीर करते. डिसेंबर महिन्यात चौदा दिवस बँका बंद राहणार आहेत. डिसेंबर महिन्यात बँकांमध्ये 14 दिवसांची सुट्टी असणार आहे.

पुढील महिन्यात पैशांशी संबंधित काही महत्त्वाचे काम तुमच्याकडे असेल तर बँक शाखेत जाण्यापूर्वी डिसेंबरमधील बँक सुट्ट्यांची यादी नक्की तपासून पाहा. डिसेंबरमध्ये चार रविवारी आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँका बंद राहतील.

या सुट्ट्यांच्या दिवशी सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र, परदेशी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक बँकांसह बँकांच्या सर्व शाखा बंद राहतात. ख्रिसमसमुळे 24 ते 26 लाँग विकेण्ड असणार आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी असेल. २९ डिसेंबर रोजी छत्तीसगड, ३० डिसेंबर मेघालय, ३१ डिसेंबर रोजी मिझोराम इथे बँकांना सुट्टी असणार आहे.

बँक जरी १४ दिवस बंद असेल तर ATM आणि ऑनलाइन सेवा सुरू असणार आहेत. त्यामुळे पैशांची देवणाघेवाण किंवा छोटी कामं ऑनलाइन बँकिंगद्वारे केली जाऊ शकतात अशी माहिती देण्यात आली आहे.

First published:

Tags: Bank holidays, Bank services