मराठी बातम्या /बातम्या /मनी /

वर्षभरात बाबा रामदेवांच्या पतंजलीने कमावले इतके कोटी; किंमत पाहून डोळे होतील मोठे

वर्षभरात बाबा रामदेवांच्या पतंजलीने कमावले इतके कोटी; किंमत पाहून डोळे होतील मोठे

Baba Ramdev Patanjali: रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीची वार्षिक उलाढाल किती आहे माहितीये का?

Baba Ramdev Patanjali: रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीची वार्षिक उलाढाल किती आहे माहितीये का?

Baba Ramdev Patanjali: रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीची वार्षिक उलाढाल किती आहे माहितीये का?

नवी दिल्ली, 2 जून : वादग्रस्त विधानांमुळे सध्या योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी अ‍ॅलोपॅथी (Ramdev baba on Allopathy) आणि आयुर्वेद (Ayurveda) याबाबत केलेल्या विधानांबद्दल सर्वत्र चर्चा आहे. बाबा रामदेव यांनीही आपल्या बाजूनं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही हा वाद अजून शमलेला नाही. बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurveda net worth) ही कंपनी कोट्यवधींची कमाई करत आहे. पतंजलीच्या वाढीचा आलेख सतत चढताच : 21व्या शतकातील भारतात झपाट्यानं वाढलेल्या व्यवसायांपैकी एक लक्षवेधक कंपनी आहे योगगुरू बाबा रामदेव यांची पतंजली एफएमसीजी कंपनी. बाबा रामदेव यांच्या या कंपनीची यशोगाथा इतर व्यावसायिक यशोगाथांपेक्षा वेगळी आहे कारण त्यांनी आपलं  साम्राज्य वाढविण्यासाठी ज्या पद्धतीने राजकारणाचा (Politics) वापर केला तसा फारच क्वचित कुणी केलेला दिसून येईल. वेगानं वाढवलं कंपनीचं नेटवर्क  : 2009 मध्ये सुरू झालेल्या पतंजलीनं देशभरात अतिशय वेगानं आपलं नेटवर्क तयार केलं. 2014 ते 2017 पर्यंत कंपनीनं जोरदार वाढ नोंदवली. आयुर्वेदाच्या मदतीने 600 रुग्ण कोरोनामुक्त; रामदेव बाबा-IMA वादावेळी मोठी अपडेट 2015  आणि 2016  या आर्थिक वर्षात पतंजलीची 100 टक्के वाढ झाली. पतंजलीनं देशात एफएमसीजी क्षेत्रात व्यवसाय करणार्‍या सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांना धूळ चारली. पतंजलीच्या उत्पादनाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता, उत्साह दिसून आला. 2017 नंतर मंदी 2017 नंतर मात्र पतंजलीच्या व्यवसायात मंदी आली आणि गेल्या 2-3 वर्षांत पतंजलीची चमक झाकोळल्याचं दिसत आहे. 'हे कसले डॉक्टर? लशीचे 2 डोस घेऊनही 1000 मेले...',रामदेव बाबांचं खळबळजन विधान नोटबंदी आणि जीएसटीनंतर अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम पतंजलीच्या व्यवसायावरही दिसून आले. या व्यतिरिक्त कंपनीचा विस्तार, धोरणे, उत्पादनातील त्रुटी यामुळं पतंजलीच्या विश्वासार्हतेवरही परिणाम दिसून आला. पतंजलीतून किती झाली कमाई : पतंजली आयुर्वेद आणि रुचि सोया (Ruchi Soya) या दोन्ही कंपन्या बाबा रामदेव यांच्या आहेत. या दोन्ही कंपन्यांची वार्षिक उलाढाल तब्बल 25 हजार कोटींची आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात पतंजलीचे उत्पन्न त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत 9.9 टक्क्यांनी वाढून 9 हजार 23 कोटी रुपये झाले. बिझनेस इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म टॉफलरच्या आकडेवारीनुसार, 2019-20 या आर्थिक वर्षात पतंजली आयुर्वेदचा नफा 21टक्क्यांनी वाढून 425 कोटी रुपये झाला. त्या आधीच्या वर्षात 2018-19 मध्ये या कंपनीला 349 कोटी रुपयांचा नफा झाला होता. पतंजली आणि रुचि सोयाची स्थापना : पतंजली आयुर्वेदची स्थापना 2006 मध्ये रामदेव बाबा आणि आणि आचार्य बाळकृष्ण यांनी केली होती. सध्या आचार्य बाळकृष्ण यांचा या कंपनीत 99.6 टक्के हिस्सा आहे, परंतु बाबा रामदेव कंपनीचे सह-संस्थापक आहेत. बाबा रामदेव रुचि सोया कंपनीचे एक नॉन-एक्झिक्युटिव्ह आणि नॉन इंडीपेंडंट डायरेक्टर आहेत.
First published:

Tags: Ayurvedic medicine, Baba ramdev

पुढील बातम्या