मराठी बातम्या /बातम्या /मनी /Baba Ramdev करणार नवीन व्यवसाय, शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा काय आहे योजना

Baba Ramdev करणार नवीन व्यवसाय, शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा काय आहे योजना

योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहातील (Patanjali Group) रुची सोया या कंपनीने आसाम, त्रिपुरा आणि ईशान्येकडच्या अन्य राज्यांमध्ये तेलताडाची लागवड करण्याचं ठरवलं आहे.

योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहातील (Patanjali Group) रुची सोया या कंपनीने आसाम, त्रिपुरा आणि ईशान्येकडच्या अन्य राज्यांमध्ये तेलताडाची लागवड करण्याचं ठरवलं आहे.

योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहातील (Patanjali Group) रुची सोया या कंपनीने आसाम, त्रिपुरा आणि ईशान्येकडच्या अन्य राज्यांमध्ये तेलताडाची लागवड करण्याचं ठरवलं आहे.

  नवी दिल्ली, 03 ऑगस्ट: योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहातील (Patanjali Group) रुची सोया या कंपनीने आसाम, त्रिपुरा आणि ईशान्येकडच्या अन्य राज्यांमध्ये तेलताडाची लागवड करण्याचं ठरवलं आहे. पतंजली समूहाने दोन वर्षांपूर्वी ही कंपनी आपल्या विकत घेतली होती. या कंपनीने तेलताडाच्या (Oil Palm) बागांसाठी शेतजमिनीचं सर्वेक्षण केलं आहे. ही लागवड शेतकऱ्यांसोबत करार (Contract Farming) करून केली जाणार आहे. आसाम, त्रिपुरासह ईशान्येकडच्या (North East States) अन्य राज्यांमध्ये रुची सोया (Ruchi Soya) ही कंपनी प्रक्रिया युनिट्सची (Processing Units) स्थापना करणार आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या बागांमधून उत्पादित झालेला कच्चा माल या प्रक्रिया युनिट्समध्ये खरेदी करण्याची हमी दिली जाणार आहे.

  मेघालय, मणिपूर, आसाम, त्रिपुरा आदी ईशान्येकडच्या राज्यांमध्ये तेलताडाच्या लागवडीसाठी जमिनीचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सध्या भारतात आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, अंदमान, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांत काही प्रमाणात तेलतालाडाची लागवड काही प्रमाणात आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये ही लागवड वाढवण्यासाठी या योजनेद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या बागांमधल्या ताडापासून रुची सोयाच्या प्रक्रिया युनिट्समध्ये तेलाची निर्मिती (Oil Production) केली जाणार आहे. काढणीनंतर 48 तासांच्या आत त्यापासून तेलाची निर्मिती करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बागांपासून जवळच्या अंतराच्या भागांमध्ये कंपनीची प्रक्रिया युनिट्स उभारली जाणार आहेत.

  हे वाचा-Aadhaar Card असल्यास मोदी सरकार देतंय 1% व्याज दरानं कर्ज? इथे वाचा सविस्तर

  योग गुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या कंपनीतर्फे केल्या जाणार असलेल्या या लागवडीची सुरुवात नेमकी कधी केली जाणार, याबद्दलची माहिती अद्याप जाहीर झाली नसल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. रुची सोया ही कंपनी सध्या गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीच्या फॉलोऑन पब्लिक ऑफरनंतर (FPO) ही लागवड सुरू केली जाऊ शकेल, असा अंदाज आहे.

  हे वाचा-Digital Payment प्लॅटफॉर्म e-RUPI लाँच, जाणून घ्या कसा आणि कुठे करता येणार वापर

  रुची सोया ही कंपनी एके काळी कर्जात बुडाली होती. त्यानंतर पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurved) कंपनीने 2019 साली ही कंपनी 4350 कोटी रुपयांना खरेदी केली. त्यासाठी पतंजली कंपनीला 3200 कोटी रुपयांचं कर्ज घ्यावं लागलं होतं. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 1200 कोटी रुपये, सिंडिकेट बँकेकडून 400 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडून 700 कोटी रुपये, युनियन बँक ऑफ इंडियाकडून 600 कोटी रुपये, तर अलाहाबाद बँकेकडून 300 कोटी रुपयांचं कर्ज पतंजली कंपनीने रुची सोयाच्या खरेदीसाठी घेतलं होतं. आता रुची सोया या कंपनीतली 4300 कोटी रुपयांचे शेअर्स फॉलोऑन पब्लिक ऑफरद्वारे विकले जाणार आहेत. या विक्रीतून मिळालेल्या रकमेतून कर्ज फेडलं जाईल, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

  First published:

  Tags: Baba ramdev