Home /News /money /

पतंजलीच्या IPO बाबत बाबा रामदेवांची मोठी घोषणा, सांगितला पुढचा प्लॅन

पतंजलीच्या IPO बाबत बाबा रामदेवांची मोठी घोषणा, सांगितला पुढचा प्लॅन

पतंजली आयुर्वैद (Patanjali Ayurved) या कंपनीचा IPO बाजारात येण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी बाबा रामदेव (Baba Ramdeo) यांनी मोठी घोषणा (announcement) केली आहे.

    मुंबई, 18 ऑगस्ट : पतंजली आयुर्वैद (Patanjali Ayurved) या कंपनीचा IPO बाजारात येण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी बाबा रामदेव (Baba Ramdeo) यांनी मोठी घोषणा (announcement) केली आहे. पुढील वर्षी  (Next year) पतंजलीचा IPO बाजारात आणणार आहोत, असं बाबा रामदेव यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. ‘रुची सोया’ (Ruchi Soya) या कंपनीचा IPO बाजारात आणण्यापूर्वीच पतंजलीचा IPO बाजारात आणण्याची योजना होती. मात्र काही कारणांमुळे हे होऊ शकलं नाही. आता मात्र आमची भिती गेली असून पुढील वर्षी पतंजलीचा IPO येणार असल्याची घोषणा बाबा रामदेव यांनी केली आहे. ‘रुची सोया’ची यशोगाथा तोट्यात असणारी रुची सोया कंपनी जेव्हा पतंजली आयुर्वैदनं विकत घेतली, तेव्हा या कंपनीचा IPO नव्याने बाजारात आणला गेला होता. केवळ 17 रुपयांना असणारा या कंपनीचा शेअर 6 महिन्यातच 1500 रुपयांच्या पार गेल्याचं सांगत 8900 टक्के नफा गुंतवणूकदारांना मिळाल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. या कंपनीचं बाजारमूल्य सध्या 32,500 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या IPO आणण्यापासूनचा सर्व प्रवास यशस्वीरित्या पार पडल्याने आता आपला आत्मविश्वास वाढला असून पुढल्या वर्षी पतंजलीचा IPO बाजारात आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शेअर बाजाराची ताकद एखाद्या कंपनीला जे उदिद्ष्ट साध्य करण्यासाठी 50 ते 60 वर्षं लागतात, ते काम शेअर बाजारामुळे 5 ते 6 वर्षात होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. मुळात, पंतजली आयुर्वेद ही कंपनी सुरुवातीला केवळ आयुर्वैदिक औषधांच्या निर्मितीचं काम करत होती. मात्र उत्तरोत्तर इतर उत्पादनंही बनवायला कंपनीनं सुरुवात केली. आता एक किराणा माल बनवणारी (FMCG) आघाडीची कंपनी म्हणून पतंजलीकडं पाहिलं जातं. हे वाचा -Amul सह 2 लाखात सुरू करा तुमचा बिजनेस, महिन्याला होईल मोठी कमाई युनिलिव्हरला मागे टाकण्याचं लक्ष भारतात व्यापार करणाऱ्या परदेशी हिंदुस्थान लिव्हर कंपनीसोबत पतंजलीची स्पर्धा असून या कंपनीला मागे टाकण्याचा कंपनीचा इरादा आहे. सध्या कंपनी स्वतंत्ररित्या काम करत असून जेव्हा या कंपनीचा IPO बाजारात येईल, त्यानंतर कंपनीचं बाजारमूल्य वाढणार असल्यामुळे देशातील नंबर एकची कंपनी होण्याचा उद्देश साध्य होईल, असा विश्वास बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे. तर रुची सोयाच्या फ्लोअर प्राईसबाबत विचार सुरू असून त्यात 10 ते 15 टक्के कपात करण्याचा विचार सुरू असल्याचं ते म्हणाले.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Baba ramdev, Share market

    पुढील बातम्या