Home /News /money /

Axis Bank मध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणार अधिक व्याज, काय आहेत नवे व्याजदर?

Axis Bank मध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणार अधिक व्याज, काय आहेत नवे व्याजदर?

अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्‍या कालावधीच्‍या विविध मुदतींमध्ये FD ऑफर करते. अॅक्सिस बँकेच्या वेबसाइटनुसार, बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 2.50 टक्के व्याजदर देत आहे.

    मुंबई, 22 जानेवारी : तुमचे खाते खाजगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेत (Axis Bank) असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅक्सिस बँकेने मुदत ठेवींचे व्याजदर (Fixed Deposit Interest Rate) वाढवले ​​आहेत. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर हे बदल करण्यात आले आहेत. FD वर Axis बँकेचे वाढलेले दर 20 जानेवारी 2022 पासून लागू आहेत. बँकेने ठराविक कालावधीसाठीच व्याजदर वाढवले ​​आहेत. अलीकडे SBI, Kotak Mahindra Bank, ICICI आणि HDFC Bank नेही एफडी व्याजदर वाढवले ​​आहेत. अ‍ॅक्सिस बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्‍या कालावधीच्‍या विविध मुदतींमध्ये FD ऑफर करते. अॅक्सिस बँकेच्या वेबसाइटनुसार, बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 2.50 टक्के व्याजदर देत आहे. 30 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींसाठी 3 टक्के व्याज दर देत आहे, तर 3 महिने आणि 6 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींसाठी 3.5 टक्के व्याजदर आहे. बेरोजगार, गरीबांसाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत; थेट खात्यात येतील पैसे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा अॅक्सिस बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदरातही बदल जाहीर केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 2.5 ते 6.50 टक्के व्याजदर मिळेल. शेअर बाजारात घसरणीदरम्यान 'या' IT स्टॉकमध्ये तेजी, काय आहे कारण? तज्ज्ञांचं मत काय? ICICI बँकेनेही FD चे दर बदलले खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. बँकेचे नवीन दर गुरुवारपासून (20 जानेवारी 2022) लागू झाले आहेत. बँकेच्या वेबसाइटनुसार, बँक आता 7 ते 29 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 2.50 टक्के आणि 30 ते 90 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 3 टक्के व्याजदर देत आहे. हे 91 दिवस ते 184 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी 3.5 टक्के आणि 185 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD साठी 4.40 टक्के व्याजदर देत आहे. बँक एक वर्ष ते 289 दिवसांच्या एफडीवर 5 टक्के व्याज देत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Axis Bank, Investment

    पुढील बातम्या