मुंबई, 17 जुलै : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर एकीकडे कर्जाचे व्याजदर वाढत आहे. मात्र दुसरीकडे बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होत आहे. कारण एफडीवरील व्याजदर वाढवण्यास बँकांनी सुरुवात केली आहे. दरम्यान खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने काही कालावधीसाठी मुदत ठेवींवर म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 16 जुलै 2022 पासून लागू अॅक्सिस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदर वाढवले आहेत. नवीन दर 16 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत. बँकेने 7 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत परंतु 6 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. तसेच 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत परंतु 8 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीच्या व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. व्याजदरात ही वाढ 0.25 टक्के असून आता नवीन व्याजदर 4.40 टक्क्यांऐवजी 4.65 टक्के असेल. उर्वरित कालावधीसाठी FD व्याजदर पूर्वीप्रमाणेच राहतील. Cheapest Car Loan: नवीन कार घ्यायचा विचार करताय? ‘या’ बँका देतायेत 8 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज कॅनरा बँकेने व्याजदर वाढवले सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेनेही एफडीचे व्याजदर बदलले आहेत. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीचे व्याजदर वाढले आहेत. बँकेचे नवीन व्याजदर 16 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत. बँकेने व्याजदरात केलेल्या दुरुस्तीनंतर बँकेला 7 दिवसांपासून 45 दिवसांपर्यंत 2.90 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. याशिवाय 91 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.05 टक्के दराने व्याज मिळेल. याशिवाय 180 दिवस ते 269 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के दराने व्याज मिळेल. 270 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 4.55 टक्के, 333 दिवसांच्या एफडीवर 5.10 टक्के, 1 वर्षाच्या एफडीवर 5.30 टक्के, 1 वर्षावरील आणि 2 वर्षांपेक्षा कमी एफडीवर 5.40 टक्के, 2 वर्षांवरील आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.45 टक्के, 3 वर्षांवरील आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.70 टक्के आणि 5 ते 10 वर्षांच्या FD वर 5.75 टक्के दराने व्याज मिळेल. Bike Tips: पावसात बाईक अचानक बंद पडली तर करा ‘हे’ काम, लगेच होईल सुरु DBS बँकेने व्याजदर वाढवले DBS बँकेत किमान 7 दिवस आणि जास्तीत जास्त 10 वर्षांच्या FDs ऑफर केल्या जातात. बँकेने 181 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी 20 ते 150 बेस पॉइंट्सने एफडी दर वाढवले आहेत. आता डीबीएस बँकेत 181 दिवस ते 269 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3.25 टक्के व्याज मिळेल, तर 270 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या FD वर 4.75 टक्के व्याज मिळेल. व्याज दर 1 वर्ष ते 375 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.65 टक्के, 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 6 टक्के आणि 5 वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या FD वर 6.75 टक्के असेल. अनेक बँकांनी एफडीचे दर वाढवले अलीकडे एसबीआय, अॅक्सिस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, आयडीबीआय बँक इत्यादींनी त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.