मुंबई, 17 जुलै: एखादी कार घ्यावी, हे अनेकांचं स्वप्न असतं. कारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही लोक पैसे जमा करतात, तर काही लोक बँकांकडून कर्ज घेतात. जर तुम्ही पैसे साठवून कार घ्यायचं ठरवलं, तर हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो, तर बँकेकडून कर्ज (Cheapest Car Loan) घेऊन, तुम्ही हे स्वप्न लवकरच पूर्ण करू शकता. तुम्ही आठ वर्षांच्या कालावधीसाठी बँकेकडून सात टक्के दराने कर्ज देखील मिळवू शकता. तथापि, कार कर्जाचा व्याजदर काय असेल, ते तुमचा क्रेडिट स्कोअर, वय, व्यवसाय इत्यादींवर अवलंबून असेल. कारच्या ऑन-रोड किमतीच्या 90-100 टक्के तुम्ही बँकेकडून वित्तपुरवठा केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगणार आहोत, जिथं तुम्हाला 8 टक्क्यांपेक्षा कमी दरात कारसाठी कर्ज मिळू शकतं. या बँका उत्तम दरात देत आहेत कार कर्ज-
- बँक ऑफ बडोदा: बँक ऑफ बडोदामध्ये, तुम्ही नवीन कारसाठी किमान 7 टक्के दराने कर्ज मिळवू शकता. कर्जासाठी 1500 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.
- SBI: देशातील सर्वात मोठी बँक SBI किमान 7.30 टक्के दराने कार कर्ज देऊ शकते. येथे कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून भरावी लागेल, जी किमान एक हजार रुपये आणि कमाल 5 हजार रुपये असू शकते.
- कॅनरा बँक: तुम्ही कॅनरा बँकेकडून 7.30 टक्के दराने कार लोन घेऊ शकता. यावर, कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून भरावी लागेल, किमान मर्यादा 1 हजार रुपये आणि कमाल मर्यादा 5 हजार रुपये असेल.
- अॅक्सिस बँक: तुम्ही खाजगी क्षेत्रातील बँकांकडून स्वस्त दरात कार देखील मिळवू शकता. तुम्ही Axis Bank मध्ये किमान 7.45 टक्के दराने कार लोन मिळवू शकता. यामध्ये 3500-7000 रुपये प्रोसेसिंग फी म्हणून भरावे लागतील.
हेही वाचा: Bike Tips: पावसात बाईक अचानक बंद पडली तर करा ‘हे’ काम, लगेच होईल सुरु यांना मिळू शकते कार लोन-
- कार लोन मिळवण्याचे निकष सर्व बँकांमध्ये वेगवेगळे असू शकतात. तथापि, बहुतेक बँकांमध्ये काही गोष्टी जवळजवळ सामान्य आहेत.
- कर्ज अर्जदाराचे वय 18-75 वर्षे असावं.
- मासिक उत्पन्न किमान 20 हजार रुपये असावं.
- सध्याच्या नोकरीवर किमान 1 वर्ष काम करत असावं.
- कोणत्याही सरकारी किंवा खाजगी कंपनीत पगारदार किंवा सेल्फ एंप्लॉयड असावा.
- सध्याच्या कंपनीत किमान एक वर्ष काम करत असावेत.