जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Aviation Turbine Fuel: विमानाच्या इंधन किमतीत या वर्षात पाचव्यांदा वाढ, विमान प्रवासही महागणार?

Aviation Turbine Fuel: विमानाच्या इंधन किमतीत या वर्षात पाचव्यांदा वाढ, विमान प्रवासही महागणार?

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा 100 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 102.14 डॉलर आणि WTI ने 96.15 डॉलर प्रति बॅरल पार केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 1 मार्च : आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती सात वर्षांच्या उच्चांकावर गेल्याने मंगळवारी देशातील विमान इंधनाच्या किमती 3.3 टक्क्यांनी वाढल्या. विमान इंधन दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती सतत वाढत असल्याने विमान इंधन किंवा एव्हिएशन टर्बाइन इंधन (Aviation turbine fuel- ATF) च्या किमतीत यंदा पाचवी वाढ झाली आहे. दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 116 व्या दिवशी स्थिर आहेत. नवी दिल्लीत सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांच्या किंमत सूचनेनुसार एटीएफची किंमत 3,010.87 रुपये प्रति किलो किंवा 3.22 टक्क्यांनी वाढून 93,530.66 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. भारतीय विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चात (operating costs) एटीएफ किंवा जेट इंधनाचा वाटा 45 ते 55 टक्के आहे. भारतातील ATF ची किंमत जगात सर्वाधिक आहे. आता पुन्हा एकदा त्यात वाढ करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा हवाई प्रवास महाग होऊ शकतो. एटीएफला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची उद्योग अनेक दिवसांपासून मागणी करत आहे. GST Collection: फेब्रुवारीत एकूण 1.33 लाख कोटींचं जीएसटी संकलन, महाराष्ट्राच्या संकलनात 21 टक्के वाढ कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा 100 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 102.14 डॉलर आणि WTI ने 96.15 डॉलर प्रति बॅरल पार केली आहे. वाढत्या किमतीचा सर्वांगीण परिणाम दिसून येत आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका! कमर्शियल LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ पेट्रोल डिझेलचे काय होईल? कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होतो. मात्र, कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीत चढ-उतार झाल्यानंतरही भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल केलेला नाही. गेल्या वर्षी दिवाळीपासून कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली नाही. नोव्हेंबर 2021 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करून जनतेला दिलासा दिला होता. भारतीय तेल कंपन्यांनी नोव्हेंबरपासून म्हणजेच दिवाळीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पाच राज्यांतील निवडणुका संपण्याची शेवटची तारीख 7 मार्च आहे, तर निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होतील. अशा परिस्थितीत 10 मार्चनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात