जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ATM Card: व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या ATM कार्डातून पैसे काढणं गुन्हा आहे? जाणून घ्या नियम

ATM Card: व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या ATM कार्डातून पैसे काढणं गुन्हा आहे? जाणून घ्या नियम

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बँक अकाउंटमधून एटीएमद्वारे (ATM Card) पैसे काढणे ( withdraw money ) योग्य आहे का अयोग्य, याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का ?

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बँक अकाउंटमधून ( bank account ) एटीएमद्वारे (ATM Card) पैसे काढणे ( withdraw money ) योग्य आहे का अयोग्य, याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का ? कायदेशीर प्रक्रिया ( legal process ) पूर्ण करून पैसे काढण्यास वेळ लागण्याची शक्यता गृहीत धरून अनेकदा थेट मृत्यू ( death ) झालेल्या व्यक्तीचे एटीएम वापरून पैसे काढण्याचे प्रकार घडतात. पण हे योग्य नाही. अशा पद्धतीने मृत व्यक्तीचे एटीएम वापरून पैसे काढता येत नाहीत. एबीपी न्यूज ने याबाबत वृत्त दिलंय. आजकाल बँकिंग जगतात बरेच बदल झाले आहेत. याआधी अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी बँकेत लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते. पण, आता एटीएम कार्ड (ATM Card), क्रेडिट कार्ड (Credit Card) आणि डेबिट कार्डमुळे (Debit Card) हे काम सोपे झाले आहे. आता तुम्हाला हवे तेव्हा कोणत्याही एटीएममधून सहज पैसे काढता येतील. परंतु, वाढत्या तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. अनेक वेळा एखाद्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर त्याच्या बँक अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी लोक एटीएम कार्डचा वापर करतात. ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. अशा प्रकारे एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अकाउंटमधून पैसे काढणे योग्य नाही. नॉमिनी देखील मृताच्या अकाउंटमधून एटीएम वापरून पैसे काढू शकत नाही. हे ही वाचा- Paytm कडून मिळतंय विना गॅरंटी 5 लाखांचं झटपट लोन, काय करावं लागले? नॉमिनी हा मृत व्यक्तीच्या एटीएममधून पैसे काढू शकत नाही. पण तो सहजपणे ते पैसे मिळवण्यासाठी दावा करू शकतो. यासाठी त्याला बँकेत जाऊन क्लेम फॉर्म (Nominee Claim Money on Bank Account) भरावा लागेल. यासोबतच त्याला बँक पासबुक, अकाउंट टीडीआर, एटीएम, चेकबुक, मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate) आणि त्याचे आधार कार्ड, वीजबिल, पॅन कार्ड आदी कागदपत्रे सादर करावी लागतील. यानंतर बँक तुम्हाला सहज पैसे देईल आणि मृत व्यक्तीचे अकाउंट बंद केले जाईल. जर मृत व्यक्तीने त्याच्या बँक अकाउंटला नॉमिनी म्हणून कोणत्याही व्यक्तीचे नाव नोंदवले नसेल, तर अशा परिस्थितीत या अकाउंटमधील पैसे सर्व वारसांमध्ये समान प्रमाणात विभागले जाऊ शकतात. यासाठी सर्व वारसांना त्यांचे उत्तराधिकार प्रमाणपत्र दाखवावे लागेल. यानंतर, बँकेत फॉर्म भरताना, मृत व्यक्तीच्या बँकेचे पासबुक, अकाउंट टीडीआर, एटीएम, चेकबुक, मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे लागेल. यासोबतच प्रत्येकाला त्यांचे ओळखपत्रही दाखवावे लागणार आहे. यानंतर बँक अकाउंटमधील पैसे कायदेशीर वारसाला देईल. हे लक्षात ठेवा कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अकाउंटमधून एटीएमद्वारे पैसे काढणे चुकीचे आहे. यासाठी आधी बँकेला कळवावे लागेल की त्या अकाउंटधारकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर, नॉमिनी संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर पैसे काढू शकतो. दुसरीकडे, त्या अकाउंटला एकापेक्षा जास्त नॉमिनी असल्यास, अशा परिस्थितीत सर्व नामनिर्देशित व्यक्तींचे संमतीपत्र बँकेला दाखवावे लागेल. त्यानंतरच पैसे काढता येतात. त्यामुळेच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अकाउंटमधून एटीएम कार्ड वापरून कधीही पैसे काढू नये, अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: ATM , death
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात