Home /News /money /

तुम्हीही मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून किंवा एटीएममधून पैसे काढत आहात? मग जाणून घ्या परिणाम

तुम्हीही मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून किंवा एटीएममधून पैसे काढत आहात? मग जाणून घ्या परिणाम

कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, तर त्या धक्क्यातून सावरायला कुटुंबीयांना बराच काळ जावा लागतो. दुःख मोठं असलं, तरी काही कामं त्याच कालावधीत करणं आवश्यक असतं. त्याच आवश्यक कामांमध्ये मृत व्यक्तीच्या बँक खात्याशी (Bank Account) संबंधित कामांचा समावेश होतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचं बँक खातं कधी बंद करायचं, त्याच्या एटीएम कार्डचं काय करायचं, अशा काही प्रश्नांची उत्तरं इथे देत आहोत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 नोव्हेंबर-  कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, तर त्या धक्क्यातून सावरायला कुटुंबीयांना बराच काळ जावा लागतो. दुःख मोठं असलं, तरी काही कामं त्याच कालावधीत करणं आवश्यक असतं. त्याच आवश्यक कामांमध्ये मृत व्यक्तीच्या बँक खात्याशी (Bank Account) संबंधित कामांचा समावेश होतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचं बँक खातं कधी बंद करायचं, त्याच्या एटीएम कार्डचं काय करायचं, अशा काही प्रश्नांची उत्तरं इथे देत आहोत. त्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियम काय आहेत, या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. अलीकडेच असं एक प्रकरण घडलं, की एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या बँक खात्यातले पैसे एटीएमद्वारे काढले. पत्नीच्या मृत्यूनंतर करावी लागणार असलेली कागदपत्रांची कामं टाळण्यासाठी पतीने हा उपाय केला होता; मात्र त्याची ही चलाखी भारी पडली. कारण बँकेने त्या पतीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरून हे स्पष्ट होतं, की कोणत्याही मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे पैसे काढणं बेकायदा (Withdrawing Money from Deceased Person's Bank Account) आहे. संबंधित व्यक्ती त्या मृत व्यक्तीची नॉमिनी (Nominee) असली, तरीही त्या व्यक्तीला अशा प्रकारे पैसे काढता येत नाहीत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीची संपत्ती आणि पैसे या बाबी त्या व्यक्तीच्या नॉमिनीकडे हस्तांतरित होण्याची एक कायदेशीर प्रक्रिया असते. कायदा काय सांगतो? कायदा सांगतो, की अशा प्रकारे पैसे काढणं म्हणजे बँक आणि अन्य कायदेशीर वारसांची फसवणूक करण्यासारखंच आहे. अशा स्थितीत बँक किंवा अन्य वारस पोलिसांत तक्रार दाखल करू शकतात. त्याचा रीतसर तपास केला जातो आणि त्यावर कारवाईही होऊ शकते. मृत व्यक्तीने हयात असताना आपल्या बँक खात्यात एकापेक्षा अधिक नॉमिनींची नावं लिहिली असतील आणि त्यांपैकी कोणी एक नॉमिनी ते पैसे वापरू इच्छित असेल, तर त्या नॉमिनीला दुसऱ्या नॉमिनीचं संमतिपत्र घेऊन बँकेत सादर करावं लागतं.बँकेत खातं असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी बँकेत डेथ क्लेम सादर करण्यापूर्वी खात्याची योग्य माहिती घ्यावी. ते बँक खातं त्या व्यक्तीचं एकट्याचं होतं की संयुक्त होतं, त्या व्यक्तीने नॉमिनीचं नाव बँकेत सादर केलेलं होतं की नव्हतं, या बाबी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय त्याच्या खात्यातल्या पैशांवर दावा सांगू शकतात; मात्र त्याचे काही नियम असतात. (हे वाचा:राज्यातील या बँकेत खाते असेल तर तुम्हाला काढता येतील फक्त 1000 रु! हे आहे कारण मृत व्यक्तीचं बँक खातं बंद करण्यासाठी त्या व्यक्तीचं नोटराइज्ड डेथ सर्टिफिकेट (Death Certificate) द्यावं लागतं. स्थानिक स्वराज्य संस्थेतून ते मिळतं. खात्याला नॉमिनीचं नाव दिलेलं असेल, तर त्या खात्यातले सारे पैसे त्या नॉमिनीला मिळतील. तो ती रक्कम त्या व्यक्तीच्या उत्तराधिकाऱ्याकडे देऊ शकतो. नॉमिनीचं नाव दिलेलं नसेल, तर कुटुंबातली जी व्यक्ती त्या मृत व्यक्तीची कायदेशीर उत्तराधिकारी (Legal Heir) असेल, त्या व्यक्तीला खातेदाराच्या डेथ सर्टिफिकेटसह आपलं आणि खातेदाराचं नातं सिद्ध करणारी कागदपत्रं सादर करावी लागतात. बँक इंडेम्निटी बाँडही मागू शकते.भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अशा बाबतीत सौम्य धोरण अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत. कुटुंबातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची माहिती बँकेला देण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही. संबंधित कुटुंब जेव्हा मानसिक धक्क्यातून सावरेल त्यानंतर हे काम केलं तरी चालतं. संबंधित मृत खातेदाराच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी खात्यातून पैसे काढण्याचा अर्ज दिला, तर बँकेने ती प्रक्रिया 15 दिवसांच्या आत पूर्ण करणं आवश्यक असल्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
    First published:

    Tags: ATM, Money

    पुढील बातम्या