नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज एफटीएक्सचे सीईओ सॅम बँकमन-फ्रॉइड यांच्या संपत्तीत फक्त 24 तासांत तब्बल 14.6 अब्ज डॉलरची घट झाली आहे. अमेरिकेतील अब्जाधीशांपैकी एक असलेल्या फ्रॉईडच्या संपत्तीत सुमारे 94 टक्क्यांनी मोठी घसरण झाली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, एका दिवसात कोणत्याही अब्जाधीशांच्या संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. काय आहे नेमकं प्रकरण - सॅम बँक्समन-फ्रॉइड यांची संपत्ती कमी होऊन 991.5 मिलियन डॉलर इतकी राहिली आहे. तर ते 15.2 अरब डॉलर इतक्या संपत्तीचे मालक होते. त्यांचे वय 30 आहे. सध्या त्यांची अवस्था ही एका गरीब माणसासारखी झाली आहे. एक चूक त्यांच्या आयुष्यात इतका मोठा भूकंप आणेल, याबाबत त्यांना कल्पना नव्हती. सॅमची निव्वळ संपत्ती क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज FTX मुळे होती आणि त्याने जाहीर केले की FTX विकले जात आहे आणि ते प्रतिस्पर्धी Binance द्वारे विकत घेतले जात आहे. त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. यानंतर, जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म Binance चे प्रमुख चांगपेंग झाओ यांनी देखील याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की FTX खरेदी करण्याचा करार झाला आहे आणि त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. FTX चे छोटे एक्सचेंज म्हणून वर्णन करताना झाओ म्हणाले की, हे एक्सचेंज रोखीच्या संकटातून जात आहे. हेही वाचा - Money Mantra - नोकरी करणाऱ्यांना मिळणार गूड न्यूज; पण बिझनेस करत असाल तर… तर सोशल मीडियामध्ये एसबीएफ म्हणून ओळखल्या जाणार्या सॅम बँकमन फ्रायडने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले आहे आणि त्यांचे वडील स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी वॉ स्ट्रीटमध्ये ब्रोकर म्हणून काम केले. परंतु त्यानंतर सॅमने 2017 मध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये स्विच केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.