मराठी बातम्या /बातम्या /मनी /एक क्लिक अन् तुमचा बँक अकाउंट रिकामं! कसं ओळखायचं हा SMS खरा की खोटा

एक क्लिक अन् तुमचा बँक अकाउंट रिकामं! कसं ओळखायचं हा SMS खरा की खोटा

खोट्या मेसेजच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार सध्या वाढल्याचं दिसून येतं. सायबर गुन्हेगार लोकांना जाळ्यात अडकवून त्यांची आय़ुष्याची कमाई काही सेकंदात लुटून नेतात.

खोट्या मेसेजच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार सध्या वाढल्याचं दिसून येतं. सायबर गुन्हेगार लोकांना जाळ्यात अडकवून त्यांची आय़ुष्याची कमाई काही सेकंदात लुटून नेतात.

खोट्या मेसेजच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार सध्या वाढल्याचं दिसून येतं. सायबर गुन्हेगार लोकांना जाळ्यात अडकवून त्यांची आय़ुष्याची कमाई काही सेकंदात लुटून नेतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : कोरोनानंतर बऱ्यापैकी ऑनलाईन पेमेंट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. बँका सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. यासोबत सायबर क्राइम ऑनलाईन फ्रॉडचं देखील प्रमाण वाढलं आहे. ग्राहकांची दिशाभूल करून त्यांच्या घामाचे पैसे लुबाडण्याचा हॅकर्सचा डाव आहे. ग्राहकांनी त्याला बळी पडू नये असं वारंवार आवाहन केलं जातं.

खोट्या मेसेजच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार सध्या वाढल्याचं दिसून येतं. सायबर गुन्हेगार लोकांना जाळ्यात अडकवून त्यांची आय़ुष्याची कमाई काही सेकंदात लुटून नेतात. दरम्यान, बँकांकडून ग्राहकांना नेहमीच याबाबत सावध राहण्याचा आणि वाचण्याचा सल्ला देणारा मेसेज दिला जातो. नुकतंच एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यासाठी फसवणूक करणारा मेसेज येत असल्याचं समोर आलं आहे.

ग्राहकांना फसवण्यासाठी काही नंबर्सवरून अशा प्रकारचे मेसेज पाठवले जात आहेत. यात बँकेतील केवायसी प्रक्रिया करण्याबाबत सांगण्यात येतं. असे मेसेज पाठवून फसवणूक करणारे ग्राहकांच्या खात्याची माहिती मिळवून पैसे लुटतात. एचडीएफसी बँकेने त्यांच्या ग्राहकांना अशा मेसेजेसपासून सावध राहण्यास सांगितलं आहे.

बँकेकडून अलर्ट! 24 मार्चआधी हे काम करा नाहीतर बंद होणार अकाउंट

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना असे मेसेज येत आहेत की ज्यात तात्काळ केवायसी अपडेट करण्यास सांगितलं जात आहे. यात मेसेजसोबत लिंकही येते ज्यावर ग्राहकांना क्लिक करण्यास सांगितलं जातं. तसंच असं न केल्यास खाते ब्लॉक होईल असंही म्हटलं जातं. ग्राहक या मेसेजला फसतात आणि लिंकवर क्लिक करतात. यानतंर ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढल्याचे मेसेज येतात.

एचडीएफसी बँकेकडून दिलेल्या माहितीनुसार कोणालाही १० अंकी नंबरवरून पाठवण्यात आलेल्या मेसेजवर कोणतीही माहिती देऊ नये. एचडीएफसी बँक कधीच तुम्हाला ओटीपी, सीव्हीव्ही किंवा वैयक्तिक माहिती ईमेल किंवा एसएमएसवरून शेअर करण्यास सांगत नाही.

अलर्ट! तुम्ही केलंय का आधार पॅन लिंक? SMS द्वारे असं करा चेक

ग्राहकांनी स्वत:ला फसवणूक होण्यापासून वाचवावं असं बँकेने काही दिवसांपूर्वी एका ट्विटमध्ये म्हटलं होतं. मेसेज कोणत्या आयडीवरून पाठवले आहेत ते नेहमी चेक करा. एचडीएफसी बँक ऑफिशियल आयडी HDFCBK/HDFCBN & links यावरूनच मेसेज पाठवते.

तसंच बँकेच्या अधिकृत लिंक या http://hdfcbk.io अशाच सुरू होतात. पॅन, केवायसी अपडेट किंवा इतर बँकिंगची माहिती मागणाऱ्या इतर नंबर्सवरून आलेल्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका. अशा एसएमएस किंवा मेलला रिपोर्ट करण्यासाठी तुम्ही report.phishing@hdfcbank.com यावर संपर्क साधू शकता.

First published:

Tags: Cyber crime, Hdfc bank, Money