Home /News /money /

Alert! कोरोना बुस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक, एक फोन आणि तुमचे पैसे गायब, कशी होते फसवणूक?

Alert! कोरोना बुस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक, एक फोन आणि तुमचे पैसे गायब, कशी होते फसवणूक?

बूस्टर डोससाठी नोंदणी करण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगार तुम्हाला कॉल करतात आणि ओटीपी क्रमांक विचारतात. त्याद्वारे ते तुमचे बँक खाती रिकामे करतात. त्यामुळे कुणालाही ओटीपी शेअर करु नका.

  मुंबई, 10 डिसेंबर : देशात सायबर फसवणुकीच्या (Cyber Fraud) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी नवनवीन आयडिया शोधून काढतात आणि लोकांना आपल्या फसवणुकीचे बळी बनवतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सायबर गुन्हेगारांनीनी (Cyber Crime) कोरोनाच्या बुस्टर डोसच्या (Corona Booster Dose) नावाखाली फसवणूक सुरू केली आहे. बुस्टर डोस मिळवण्याच्या नावाखाली या ठगांनी लोकांना आपला बळी बनवण्यास सुरुवात केली आहे. बूस्टर डोससाठी नोंदणी करण्याच्या बहाण्याने ते लोकांना कॉल करतात आणि ओटीपी क्रमांक विचारतात आणि त्याद्वारे ते तुमची बँक खाती रिकामे करतात. अशा प्रकारे होते फसवणूक >> कॉल येईल आणि ठग विचारेल - तुम्हाला दोन्ही लसी मिळाल्या आहेत का? >> तुम्ही हो म्हणाल. >> ठग- सर तुम्हाला बूस्टर डोस घ्यावा लागेल. मी तुमची नोंदणी करत आहे. OTP येईल, तो कळवा. >> तुम्ही तुमचा OTP सांगताच तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.

  Buzzing Stocks : शेअर बाजारात आज चर्चेत राहतील असे स्टॉक्स, चेक करा लिस्ट

  देशात 24 तासांत 1,59,632 नवीन रुग्णांची नोंद

  देशात कोरोनाच्या नवीन वेरिएंट ओमिक्रॉनचे 552 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूच्या या प्रकाराने संक्रमित लोकांची संख्या 3,623 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली. शनिवारची रात्र ठरली काळरात्र;नवविवाहित जोडपं झोपेतून उठलंच नाही, हृदयद्रावक शेवट मंत्रालयाच्या सकाळी 8 वाजताच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या संसर्गाची 1,59,632 नवीन केसेस नोंदवली गेली, जी गेल्या 224 दिवसांतील सर्वाधिक दैनंदिन प्रकरणे आहेत. देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5,90,611 वर पोहोचली आहे, जी सुमारे 197 दिवसांतील सर्वाधिक आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 29 मे रोजी संसर्गाची 1,65,553 प्रकरणे नोंदवली गेली होती. गेल्या 24 तासांत देशात 327 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 4,83,790 वर पोहोचली आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Cyber crime, Financial fraud, Money

  पुढील बातम्या