जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Airtel चं कार्ड वापरता? दरमहिन्याच्या रिचार्जवर वाचवता येतील 300 रुपये, जाणून घ्या कसे

Airtel चं कार्ड वापरता? दरमहिन्याच्या रिचार्जवर वाचवता येतील 300 रुपये, जाणून घ्या कसे

एयरटेल रिचार्ज

एयरटेल रिचार्ज

सध्याच्या काळात मोबाईल यूझर्स हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यापैकी अनेक जण एयरटेलचे ग्राहक आहेत. एयरटेलच्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा मिळतेय याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 4 एप्रिल: तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एअरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे तुम्ही एअरटेल मोबाइल/डीटीएच रिचार्ज, एअरटेल ब्लॅक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर पेमेंटवर दरमहा 300 रुपयांची बचत करु शकता. मात्र दरमहा 300 रुपये कॅशबॅक मिळविण्यासाठी, तुमच्याकडे Airtel Axis Bank क्रेडिट कार्ड असणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी भारती एअरटेल आणि अ‍ॅक्सिस बँकेने हे क्रेडिट कार्ड आणलंय.

News18लोकमत
News18लोकमत

एयरटेल अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड हे एक को-ब्रांडेड क्रेडिट कार्ड आहे. हे कार्ड व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व व्यापारी आउटलेट किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते Airtel Thanks App वर या क्रेडिट कार्डच्या वापराने ग्राहकांना जास्त फायदा होईल. यासोबतच स्विगी आणि झुमॅटोवरुन जेवण ऑर्डर करण्यासाठीही हे क्रेडिट कार्ड एक बेस्ट कार्ड ठरु शकतं.

Loan Recovery: लोन वसुलीसाठी रिकव्हरी एजेंट देऊ शकत नाही धमकी, काय आहेत तुमचे अधिकार?

का बेस्ट आहे हे कार्ड

-Airtel Axis Bank क्रेडिट कार्ड जारी केल्यापासून 30 दिवसांच्या आत कार्ड अ‍ॅक्टिव्हेशनवर ग्राहकांना 500 रुपयांचे Amazon व्हाउचर दिले जाईल. -Airtel Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे Airtel Thanks अ‍ॅपवर Airtel Mobile/DTH रिचार्ज, ब्रॉडबँड आणि वाय-फाय पेमेंटवर 25% कॅशबॅक उपलब्ध असेल. (एका ​​महिन्यात जास्तीत जास्त रु.300 कॅशबॅक) -ग्राहकांना एअरटेल ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे एअरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे वीज, गॅस किंवा पाणी बिल पेमेंटवर 10% कॅशबॅक मिळेल. (एका ​​महिन्यात जास्तीत जास्त रु.300 कॅशबॅक) -Airtel Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना Swiggy, Zomato आणि Bigbasket वर खर्च केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. -क्रेडिट कार्ड धारकांना इतर सर्व खर्चांवर 1% कॅशबॅक मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airtel
  • First Published :
जाहिरात
जाहिरात