मुंबई, 22 जानेवारी: तुम्ही 2023 मध्ये कुटुंबासोबत सुट्टी साजरी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टार अलायन्सचा सदस्य आणि टाटा समूहाची एअरलाइन्स कंपनी एअर इंडियाने भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या देशांतर्गत नेटवर्कवरील फ्लाइट तिकिटांवर सवलतींसह ऑफर सुरू केल्या आहेत. या अंतर्गत, कंपनी फक्त 1,705 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विमान प्रवासाची ऑफर देत आहे. याच ऑफरविषयी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत.
कधीपर्यंत आहे ऑफर
शनिवार 21 जानेवारीपासून सुरू होणारी ही ऑफर 23 जानेवारीपर्यंत सुरु असणार आहे. एअरलाइनच्या अधिकृत ट्रॅव्हल एजंटसह सर्व एअर इंडिया बुकिंग प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. ही सवलतीची तिकिटे इकॉनॉमी क्लासमध्ये उपलब्ध असतील आणि 1 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत भारतातील देशांतर्गत नेटवर्कवरील प्रवासासाठी लागू होतील.
भाडे 1705/- पासून सुरू
कंपनीची ही ऑफर देशांतर्गत उड्डाणांवर लागू होईल. 1705 रुपये एकमार्गी भाड्यापासून सुरू होणारी ऑफर 49 पेक्षा अधिक देशांतर्गत मार्गांसाठी ही सूट उपलब्ध असेल. आता तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत ड्रिम हॉलिडे टूरला प्लान करायचा असेल तर हा प्लान तुमच्यासाठी बेस्ट आहे. एअर इंडियाच्या या खास ऑफरचा तुम्ही सहज फायदा घेऊ शकता.
देशांतर्गत नेटवर्कवरील काही एकतर्फी सवलतीचे भाडे खालीलप्रमाणे आहेतः
-दिल्ली ते मुंबई - 5075 -चेन्नई ते दिल्ली - 5895 -बंगळुरू ते मुंबई - 2319 -दिल्ली ते उदयपूर - 3680 -दिल्ली ते गोवा - 5656 -दिल्ली ते पोर्ट ब्लेअर - 8690 -दिल्ली ते श्रीनगर - 3730 -अहमदाबाद ते मुंबई - 1806 -गोवा ते मुंबई - 2830 -दिमापूर ते गुवाहाटी - 1783
तिकीट कसे बुक करावे
एअरलाइननुसार, ही विक्री सर्व एअर इंडियाच्या सर्व सिटी ऑफिस, एयरपोर्ट ऑफिस, वेबसाइट, मोबाइल अॅप आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे उपलब्ध असेल. तसेच, प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा तत्त्वावर भाडे उपलब्ध असेल.