साहेबराव कोंकणे, प्रतिनिधी, अहमदनगर : कांद्याचे दर कोसळल्याने राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. अहमदनगरच्या नेप्तीच्या कांदा बाजारात कांद्याला सरासरी 5 ते 6 रुपये दर मिळत आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. इतर राज्यात वाढलेले कांद्याचे उत्पादन, कांद्याची घटलेली मागणी या सगळ्यामुळे खूप हाल झाले आहेत.
सरकारचे कांदा निर्यात धोरण यामुळे कांद्याचे दर घसरल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर कांद्याची लागवड ही 30 टक्क्यांनी वाढली आहे. त्यातच लाल कांदा हा जास्त काळ टिकत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला जात आहे.
नाशिक : कांद्याचे भाव गडगडले, संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून सुरू केलं आंदोलन
व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करताना स्थानिक बाजारात आडत, ट्रक भाडे , हमाली द्यावी लागते. विक्रीच्या वेळीही हा खर्च द्यावा लागतो त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांना जास्त भाव देऊ शकत नाही असं व्यापारी सांगतात. तर यंदा महाराष्ट्रासह इतरही राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने हा परिणाम झाल्याचे शेतकरी सांगतात.
Success Story : शेतकऱ्यानं पिकवला तब्बल पाऊण किलोचा कांदा! विश्वास बसत नसेल तर पाहा Video
दुसरीकडे लासलगावमध्ये सोमवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 10 तास लिलाव बंद पाडून आंदोलन केलं होतं. हे आंदोलन पालकमंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर अखेर मागे घेण्यात आलं. भुसे यांनी लासलगावला येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पुढच्या आठकड्यात शेतकरी शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्या सोबत बैठक करू असं यावेळी आश्वासनही दिलं आहे.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. अगदी हातात 2 रुपये उरत आहेत. तर दुसरीकडे नगरमध्ये कांद्याला अक्षरश: ५ ते ६ रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Onion