मराठी बातम्या /बातम्या /मनी /शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! तुरीच्या भावात झाली मोठी वाढ, पाहा काय आहेत दर

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! तुरीच्या भावात झाली मोठी वाढ, पाहा काय आहेत दर

(सौजन्य सोशल मीडिया)

(सौजन्य सोशल मीडिया)

Aurangabad News : गेल्यावर्षीच्या तुलनेत तुरीला चांगला भाव मिळत आहे. काय भाव मिळत आहे जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

    सुशील राऊत, प्रतिनिधी 

    औरंगाबाद, 23 फेब्रुवारी : कापसाची भाववाढ होत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच शेतकऱ्यांची तूर बाजारात दाखल झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तुरीला चांगला भाव मिळत आहे. गेल्यावर्षी तुरीचा भाव हा 5 हजार 250 असा होता. मात्र, यंदा 7 हजार 500 ते 8 हजार 050 पर्यंत भाव तुरीला औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मिळत आहे.

    मराठवाड्यामध्ये कापूस, सोयाबीन, तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. यावर्षीही तुरीला चांगला भाव मिळेल याचा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन घेतलं. तुरीला यावर्षी चांगला भाव मिळत आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तुरीवर बुरशीचा आजार आढळून आला होता तसेच काही ठिकाणी तूर फुलांच्या अवस्थेत आलेली असताना त्यावरती धुके पडलेले होते. त्यामुळे फुलं गळून पडली होती. तर काही ठिकाणी तुरीच्या झाडाला शेंगा आल्या त्या भरल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा 30 टक्के उत्पादनात घट झाली होती.

    शेतकऱ्यांना फायदा

    गेल्या वर्षी तुरीचा भाव कमी होता. मात्र, यावर्षी तुरीच्या भावात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी फायदा झाला आहे. सध्या तुरीला 7 हजार 500 ते 8 हजार 050 पर्यंत भाव मिळत आहे, अशी माहिती व्यापारी जुगल किशोर दायमा यांनी दिली.

    वातावरणातल्या बदलांचा आंब्याच्या झाडांना धोका! नुकसान टाळण्यासाठी 'ही' घ्या काळजी, Video

    यंदा तुरीला चांगला भाव मिळेल अपेक्षाप्रमाणे आम्ही तुरीचे उत्पादन घेतले. त्यानुसार चांगला भाव तुरीला मिळाला आहे. या भावामुळे यावर्षी चांगला  फायदा झाला आहे, असं तुर उत्पादक शेतकरी सखाराम जाधव यांनी सांगितले.

    First published:
    top videos

      Tags: Agriculture, Aurangabad, Farmer, Local18