भरतपूर : पारंपरिक शेती सोडून शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. आता पारंपारिक शेतीबरोबरच फळबाग लागवडीकडे विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे कमी खर्चात अधिक नफा घेऊन शेतकरी आपली आर्थिक स्थिती सुधारत असल्याचं दिसत आहे. जगदीश मीणा हे राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील भुसावर शहरातील असेच एक शेतकरी असून ते पारंपारिक शेतीसोबत बागायती करून वर्षाला लाखो रुपये कमवत आहेत. शेतकऱ्याने सांगितले की, चार वर्षांपूर्वी त्यांनी राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातून चिकूची ३०० रोपे मागवून तीन हेक्टर जमिनीत बागायती लागवड सुरू केली. झाडांसाठी खतांऐवजी स्वयंनिर्मित सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला. त्यामुळेच या झाडांची चांगली वाढ होऊन जास्त उत्पादन मिळाले आहे. या फळाला बाजारात चांगली मागणी असल्याने या फळाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कमी खर्चात चांगला नफा मिळत आहे. त्याचबरोबर या शेतकऱ्याचे उत्पन्न पाहून आजूबाजूचे शेतकरीही ही शेती करू लागले आहेत.
80 टक्के सब्सिडी आणि लाखोंचा फायदा, लीलियम फुलांनी बदललं शेतकऱ्याचं आयुष्यशेतकरी जगदीश मीणा यांनी सांगितले की, पारंपारिक शेतीसोबतच ते अनेक वर्षांपासून फळबागही करत आहेत. फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्याला होणारा आर्थिक फायदा त्यांना चांगलाच माहीत आहे.
ही बाब लक्षात घेऊन चार वर्षांपूर्वी राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातून चिकूची 300 रोपे खरेदी करून तीन हेक्टर जमिनीवर फळबाग लागवड सुरू केली. या शेतीमध्ये रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला.
व्यथा बळीराजाची! वीज मिळेना, पाण्याची टंचाई; शेतकऱ्याने तीन एकरातला गहू पेटवलायामुळेच ही झाडे अल्पावधीतच चांगली वाढली आहेत. सेंद्रिय खतांपासून तयार होणाऱ्या या शेतीमध्ये रासायनिक खतांच्या पिकापेक्षा तीन ते चार पट अधिक भाव मिळतो. साधारण 20 टनच्या आसपास उत्पादन निघत असून 8 लाखांपर्यंत शेतकऱ्याला त्यातून पैसे मिळतात. मोठे व्यापारी किंवा ऑर्डर्स मिळाला तर अधिक फायदा होतो. महाराष्ट्र, आगरा, दिल्ली, हरियाणा सारख्या ठिकाणी देखील चीकूचं मोठं उत्पादन केलं जातं.