सांगली, 22 मार्च : पूर्णतः सेंद्रिय शेतीकडे जाणे हा वेडेपणा ठरेल, असेच सेंद्रिय शेतीच्या नावाखाली प्रचंड बुवाबाजी आणि फसवणूक चालू आहे. असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते सांगलीत अग्रणी शिवार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
सेंद्रिय शेती वाढली तर जगामध्ये अन्नधान्याचा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. सगळ्या जगानं सेंद्रिय शेती करावी या मताचा मी नाही. कारण देश स्वतंत्र झाला त्यावेळी देश सेंद्रिय शेती करत होता. रासायनिक खते, कीटकनाशके माहित नव्हते.
मराठवाड्यातील छोट्या खगोलशास्त्रज्ञानाला मिळणार मोठी संधी, पाहा Video
त्यावेळी लोकसंख्या 35- 40 कोटीच्या आसपास असताना बाहेरच्या देशातून भीक मागून या देशातील जनतेला अन्नधान्य खायला आणावे लागत होते. आज 40 कोटीची लोकसंख्या 140 कोटीवर गेली तेव्हा तरी रासायनिक खतांच्या वापरामुळे पुरेसं अन्नधान्य आज मिळत आहे, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.
बिहारमध्ये सेंद्रियशेतीची नवी पद्धत
दरम्यान, बिहारमधील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आपल्या शेतीला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवतात. दरम्यान ते यज्ञ देखील करतात या यज्ञामध्ये शेण आणि गोमूत्र मिसळून खत तयार केले जाते, त्याचा वापर शेतीत केला जातो. या खतामुळे पिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कीटकांचा नाश तर होतोच शिवाय चांगले उत्पादन मिळण्यासही मदत होत असल्याचे शेतकऱ्यांनी माहिती दिली.
अडीच एकर द्राक्ष बाग काही क्षणात भुईसपाट, शेतकऱ्याचे लाखो रूपये पाण्यात, Video
अग्निहोत्र शेती करण्यासाठी 1 एकर जमिनीच्या मध्यभागी यज्ञवेदी तयार केली जाते. जिथे दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 मिनिटे यज्ञ केला जातो, ज्यामध्ये देशी गायीचे तांदूळ आणि तूप अर्पण केले जाते. यातून निघणारी राख शेण आणि गोमूत्र मिसळून खत तयार केले जाते, ते पिकांना लावले जाते. यामुळे जमीन शुद्ध होते असे स्थानिक शेतकऱ्यांनी माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Farmer protest, Organic farming, Raju Shetti (Politician)